शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
अखील भारतीय रोजगार हमी कामगार वेल्फेअर संघटना ही भारतातील असंघटीत रोजगार हमी कामगारांची एकमेव रजिस्टर्ड संघटना आहे.या संघटनेच्या चिमूर तालुका अध्यक्षपदी आयु.प्रदीप बाबुराव गजभिये यांची नियुक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण गजभिये यांनी केली आहे.
श्री.प्रदिप बाबुराव गजभिये मु.पो.पळसगाव,तह.चिमूर,जि.चंद्रपूर,राज्य महाराष्ट्र येथील रहिवासी आहेत.
त्यांची नियुक्ती दिनांक 10/01/2026 ला करण्यात आली आहे.संघटनेच्या ध्येय धोरणानुसार आपण कामगिरी पार पाडाल अशी अपेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी व्यक्त केली आहे.



