महाराष्ट्रात शिवशाहीच्या आधी मुस्लिम राजवट होती परंतु ते मुस्लिमराजे धर्मांध नव्हते.धर्मांतर हा त्यांचा विषय नव्हता,तर फक्त भूभाग ताब्यात घेणे आणि त्यावर आपली सत्ता स्थापून ती कायम करणे हा होता,” धर्मपरिवर्तन किंवा धार्मिक राष्ट्र ” हा त्यांचा उद्देश राहिला असता तर भारतावर मुस्लिमांनी ( मुस्लिम आणि मुघल यांनी ,) 500 वर्ष राज्य केले,त्या काळी भारताची लोकसंख्या कोटीत नव्हती तर लाखातच होती,अशावेळी त्यांनी 500 वर्षात जबरदस्तीने किंवा लालुच दाखवून सारा भारत मुस्लिम केला असता,आज भारतात एकही हिंदू दिसला नसता.शिवाजी महाराजांच्या आधीच्या मुस्लिम राजांनी भारताला महाराष्ट्राला मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केले नाही.कारण त्या मुस्लिम राज्यांचे धोरण आणि विचार हे ” सारे अल्लाचे लेकरे,आणि सारे धर्म पण अल्लाचेच ” हे असल्यामुळे त्यांनी बंधुभावाचे तत्व जोपासले,सर्वधर्म समभाव,धार्मिक स्वातंत्र्य,धर्मनिरपेक्षता या धोरणानेच राज्यकारभार केला.म्हणून भारत मुस्लिम राष्ट्र बनले नाही.पुढे हेच धोरण शिवाजी महाराजांनी चालू ठेवले,नव्हे याही पुढचे त्यांचे पाऊल म्हणजे धर्मांतर्गत जाती व्यवहार नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.जात आणि धर्म समोर ठेवून त्यांनी राज्य चालविले नाही,उलट यांना मूठमाती देऊन सामातभाव चे धोरण स्वीकारले आणि ते राबविले.लोकांच्या डोक्यातील जातींचे आणि धर्माचे वळवळ नारे किडे त्यांनी प्रत्यक्ष कृतीने त्यांनी मारून टाकले.मराठा,धनगर, कोळी, माळी, महार,मांग , वाणी, हटकर,अशा अठरापगड जातींना एकत्र केले,स्वराज्याच्या एका धाग्यात यांना गुंफले,हाताची विस्तारित बोटांची वज्रमूठ बांधली,ताकद निर्माण केली,शक्तीचे सर्वांना दर्शन घडविले,या शक्तीला तुकाराम महाराजांच्या ‘ भक्ती ‘ ची जोड दिली,स्वतःची ‘ युक्ती ‘ वापरली,सर्व धर्मांची सांगड घातली,थोडक्यात शक्ती भक्ती युक्ती ची सांगड घालून जिजाऊंचे स्वराज्याचे स्वप्न स्वप्न साकार केले.
शिवशाहीने हिंदुराष्ट्र चे स्वप्न पाहिले नाही.तर त्यांच्या राज्याची भूमिका धर्मनिरपेक्ष च होती,धर्माला राष्ट्रीय किंवा सामाजिक स्थान न देता खाजगी आणि मर्यादितच स्थान दिले.त्यांनी धर्मस्वातंत्र्य,सर्वधर्म समभाव,धर्मचिकित्सा हे धोरण अवलंबिले.स्वतः शिवाजी महाराज हिंदू धर्माचे ( वैदिक ब्राह्मण नव्हे ) असले तरी त्यांनी इतर धर्मांचा द्वेष केला नाही,त्यांना समानतेची ,बंधुभावाची वागणूक दिली.म्हणूनच किल्ल्यावर मंदिराजवळ मसजीत बांधली कारण मुस्लिम सैन्याला नमाज अदा करणेसाठी.सैन्याला सक्त ताकद दिली की,लढाईत जर कुराण हाती लागले तर ते आदराने मुस्लिमाना द्यावे म्हणून.
या वरील मुस्लिम आणि हिंदू राजा आणि राज्यापासून बाबासाहेबांनी नागरिकांचे धर्मस्वातंत्र्य आणि सरकारचे धर्मनिरपेक्षतेचे तत्व ,धोरण भारतीय संविधानात समाविष्ट केले आहे.हे आपणास दिसून येते.तसेच शाहूमहाराजांनी 1902 मध्ये बहुजनांसाठी ( sc,st,obc,) 50 टक्के चे आरक्षण राखीव ठेवले,हेच धोरण बाबासाहेबांनी संविधानात समाविष्ट केले.म्हणजेच आपले भारताचे संविधान म्हणजेच शिवशाहीचे आणि शाहूमहाराजांचे संविधान होय,म्हणून काही जातीवादी आणि धर्मांध लोक बाबासाहेबांनी ते लिहिले म्हणून त्यास विरोध करणे,हा संघियांचा डाव ओळखायला पाहिजे.
आर एस एस किंवा बीजेपी ला हे संविधान का मान्य नाही ? याचे कारण त्यांना आपल्या देशासाठी शाहूफुले आंबेडकर किंवा शिवाजी महाराजांचे संविधान ( जे समता समानता,स्वातंत्र्य ,बंधुभाव,धर्मनिरपेक्षता,लोकशाही,न्याय ) या तत्त्वाचे आहे,हे त्यांना नको आहे,कारण हे महामानव त्यांचे आदर्श नाहीत,तर त्यांचे आदर्श वंशवादी हुकुमशाही वादी जर्मनीचा हिटलर आणि इटलीचा मुसोलिनी आहे.हे दोन त्यांचे महामानव आहेत. मनु स्मृती,हे त्यांचे विषमतावादी संविधान आहे.पेशवाई ही त्यांची आदर्श राज्याची संकल्पना आहे.
पेशवाईत बाजीराव राजाने आपल्या राज्याचे संविधान,राज्यघटना,म्हणून मनुस्मृती लागू केली,ज्यात जातीची उतरंड आहे,वंशवाद,घराणेशाही,हुकुमशाही आहे.सामाजिक विषमता आहे,आर्थिक विषमता आहे,वेदातील देव दैव भूत प्रेत,स्वर्ग मृत्यु पाताळ,पुनर्जन्म, आत्मा,भेदभाव,उच्चनीचता,वरिष्ठकनिष्ठ,अस्पृश्यता,माणसाचे स्थान मान जात धर्म हे कर्माने नसून जन्माने ठरते,ज्या वर्गात,जातीत,धर्मात जो जन्म घेतो त्यात बदल करता येत नाही.त्याचे स्वातंत्र्य नाही.असे मनु चे तत्वद्न्यान आणि कायदा आहे. ते मनुस्मृतीत लिहून ठेवले आहे.ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि दलित स्त्रिया या अती शूद्र अशी समाजाची विभागणी या मनूने केली.त्याचे कायदे बनविले.पुरुषसत्ताक कुटुंबाची निर्मिती केली.स्त्रीपुरूष समानतेच्या विचारला छेद दिला.एकसंध समाजाचे चरवर्णं म्हणजे चार तुकडे केले,आणि अजून चार चे साडेसहा हजार जातीत एकसंघ समाजाचे तुकडे तुकडे केले.त्यांच्यात जाती धर्मांची भांडणे लाऊन राष्ट्राची एकात्मता आणि अखंडता धोक्यात आणली.समाजातील एका विभागास अस्पृश्य समजून त्यांचा विटाळ होऊ नये म्हणून त्यांच्या गळ्यात गाडगे टाकण्यासाठी आणि कमरेला झाडू पायाचे ठसे पुसण्यासाठी बांधले,स्त्रीयांना व दलिताना अस्पृश्य ठरविले,त्यांना शिक्षण ,धर्म,संपती, प्रतिष्ठा,सत्ता या गोष्टींचा अधिकार नाकारला.अशी ही मनुस्मृती म्हणजे राज्यघटना पेशवाईची,बाजीराव राजाने लागू केली.ती इंग्रजांनी महार आणि काही बहुजन असलेल्या सैन्याच्या तुकडीद्वारे लढाई करून पेशवाई उध्वस्त केली.
वरील विश्लेषण असे सांगते की,मुस्लिम राज्यांचे राज्य शिवशाहीने संपुष्टात आणले.शिवशाही ही पेशवाईने संपविली,पेशवाई ही इंग्रजांनी संपविली.आणि इंग्रजशाही ही ” आम्ही भारताचे लोक ” यांनी संपविली.याचा अर्थ भारताचा राजकीय इतिहास हा असा आहे.आता भारतात भारतीय लोकांचे राज्य आहे.लोकशाहीराज्य आहे.जे धर्मनिरपेक्ष या तत्त्वाने चालते.इथे 1947 पासून सारे भारतीय हे सार्वभौम आणि स्वतंत्र आहेत.कुण्या एका राज्याचे,कुण्या एका धर्माचे,जातीचे गुलाम नाहीत.भारतात राहणाऱ्या प्रत्येकास जात धर्म बदलण्याचा किंवा न मानण्याचे स्वातंत्र्य आहे.देव न मानण्याचे पण स्वातंत्र्य आहे.विचार आणि अभिव्यक्ती आणि संघटना स्वातंत्र्य आहे.परंतु 2014 ले सत्तेत आर एस एस ,बीजेपीच्या रूपाने हळूच चोर पावलाने आले आहे. ज्यांना बहुजनांचे आरक्षण मान्य नाही,बहुजनांना शिक्षण संपती आराधना लोकशाही चे अधिकारी स्वातंत्र्य देणे मान्य नाही.हे संविधान,हे सारे महामानव,तिरंगा झेंडा मान्य नाही.तर परत इथे महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या भारतात परत शिवशाही लोकशाही नष्ट करून पेशवाई स्थापन करायची आहे.” हे तर माझे नसून रयतेचे राज्य आहे ” असे उदात्त ध्येय्य असलेले शिवाजी महाराज संप ऊन,धर्मांध हिंदुसम्राट शिवाजी महाराज त्यांना प्रस्थापित करायचे आहेत.इतिहासातील सर्व लढाया आणि राजे आणि त्यांचे राज्य हे केवळ सत्तेसाठी,संपत्तीसाठी नसून केवळ धर्मासाठीच ते होते,त्या लढाया होत्या हे विचार जनमानसात रुजविण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न गेल्या दीडशे वर्षापासून चालू आहे.यात ते दीडशे वर्षानंतरच्या मशागती नंतर यशस्वी झाले आहेत.परंतु प्रतिगाम्यांचे ते यश म्हणजेच पुरोगाम्यांचे अपयश आहे आणि बहुजनांचे जीवन परत पेशवाईचे भोग भोगनेच आहे.
बहुजनास धर्माची गोळी देऊन नशेत ठेवले आहे,आणि देवाचे इंजेक्शन देऊन बेहोश केलेले आहे,या आर एस एस नी.
लोकशाही समाजवाद स्वातंत्र्य बंधुभाव न्याय संपलेला आहे.संविधान संपले आहे.आता बीजेपी सरकारने निवडणूक आयोग ,रिसर्वबँक,राष्ट्रपती,लोकसभा सभापती ही लोकशाहीची सर्व शक्तिस्थळावर आपल्याच विचारांची विषमतेचे पुरस्कर्ते यांना बसविले आहे.खरे तर आता इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे.शिवशाही चे राज्य पेशवाईने बळकावले आहे.जसे पेशवाई चोरपावलांनी त्याकाळी आली अगदी त्याच चोरपावलांनी पेशवाई येऊन सत्तेत बसली आहे.परंतु ही पेशवाई संपविण्यासाठी आता इंग्रज येणार नाहीत,तर येथीलच बहुजनांनी या पेशवाईशी दोन हात करून तिला पळवून लावले पाहिजे.अन्यथा विषमता आणि गुलामीत जीवन कंठीत आणि कुंठीत जगावे लागेल.



