चिमूर तालुक्यातंर्गत वनविभागाच्या परिसरातून अवैध वाळू चोरी,अन् मृत्यूदेह.. — तालुका चोरमय झाला? संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात का म्हणून येवू नये?

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

             वृत्त संपादीका

    चिमूर तालुका अवैध उत्खननातंर्गत वाळू व मुरुमांच्या चोरांचा तालुका म्हणून आता नव्याने ओळखला जातो आहे.या तालुक्यात अवैध उत्खननातंर्गत कोणती घटना घडेल हे सांगता येत नाही.

          आज पहाटेच्या सुमारास नवेगाव(रामदेगी-खडसंगी) परीसरातून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या टॅक्करच्या चक्क्याखाली दबून आकाश सोनटक्के रा.नवेगाव या २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली अन् खडबळ उडाली.

            मृत्यू घटनास्थळ चिमूर तालुक्यातील फाॅरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र खडसंगी या अंतर्गत येतो आहे.

              लोक चर्चेतील भाग लक्षात घेता,खडसंगी येथील ट्रॅक्टर मालकाला राजकीय वरदहस्त असले तरी चिमूर पोलिस विभाग त्यांच्यावर मनुष्यवधासह वाळू चोरीचा गुन्हा दाखल करणार असे गृहीत धरण्यास हरकत नाही.

            एकदाची घटना घडली की कुणीच कुणाला कायद्याच्या चाकोरीतून वाचवीत नाही हे स्पष्ट आहे.

            मात्र,चिमूर तालुक्यातंर्गत वाळू व मूरुमांच्या अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष करीत उत्खनन चोरट्यांना सर्रासपणे रान मोकळे करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे असी चिमूर तालुक्यातंर्गत दबक्या आवाजात लोकचर्चा सुरु आहे.

           चिमूर तालुका हा मुरुम व वाळू चोरांचा अड्डा झाला असल्याने या तालुक्याची ओळख चोरमय होवू नये याची दक्षता कोण घेणार?