लोकसभेत नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर…. — भाजपचा आनंदोत्सव साजरा….

 

प्रितम जनबंधु

संपादक 

भंडारा :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने लोकसभेत नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर केल्याबद्दल भाजपाच्या वतीने भंडारा शहरातील गांधी चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारचे अभिनंदन करून या महिला सशक्तीकरणासाठी घेतलेल्या कल्याणकारी निर्णयाबद्दल आनंद साजरा केला. 

 

               पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सर्व आघाड्यांवर यशस्वी होत असतांना महिलांनाही देशाच्या राजकारणात समान वाटा मिळावा म्हणून घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय असल्याची भावना यावेळी भाजपा पदाधिकार्यांनी व्यक्त केली. फटाक्याची आतिषबाजी करून आणि घोषणा देऊन जल्लोष तर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

 

                   यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कल्याणी भूरे, मंजिरीताई पनवेलकर, साधना त्रिवेदी, मधुरा मदनकर, रोशनी पडोळे, माधुरी तूमाने, श्रद्धा डोंगरे, अर्चनाताई श्रीवास्तव, डॉ उल्हास फडके, अनूप ढोके, संतोष त्रिवेदी, आबिद सिद्दीकी, चैतन्य उमाळकर, संजय कुंभलकर, महेंद्र निंबार्ते, मयूर बिसेन, आशु गोंडाणे, रूबी चड्डा, डीमू शेख, प्रमोद धार्मिक, विनोद बांते, सचिन कुंभलक, विकास मदनकर, शैलश मेश्राम, अजय ब्रामणकर, सुदीप शहारे, प्रशांत निंबोळकर, शैलेश श्रीवास्तव, अतुल वैरागडकर, नितीन कुथे, रमेश साकुरे, अजय कावडे, अमित बिसेन, भूषण महाकाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.