लाखनीत तयार झाल्या ‘पर्यावरणस्नेही गणेश मूर्ती… — ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचा इकोफ्रेंडली गणेशोत्सव उपक्रम… — नेफडो,अभाअंनिस लाखनी, गुरुकुल आयटीआय,नगरपंचायत लाखनीचा अभिनव उपक्रम…

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

लाखनी:-

     येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब मागील 18 वर्षांपासून पर्यावरणस्नेही गणेशोत्सव दरवर्षी साजरा करत असून यावर्षी सुद्धा पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवा स्पर्धा, कृत्रिम विसर्जन कुंड तसेच निर्माल्य संकलन उपक्रमाचे आयोजन ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब,नगरपंचायत लाखनी, नेफडो विभागीय वन्यजीव समिती जिल्हा भंडारा,अभा अंनिस तालुका शाखा लाखनी तसेच गुरुकुल आयटीआय लाखनी यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे.

    यानिमित्ताने ग्रीनफ्रेंड्सच्या विद्यार्थी सदस्यांसाठी इकोफ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.

        याप्रसंगी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने यांनी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या मागील 18 वर्षांपासून पर्यावरणस्नेही सण साजरे करण्याच्या सातत्यपूर्ण रेट्यामुळे परिसरातील अनेक पर्यावरण संस्था सुद्धा इकोफ्रेंडली पध्दतीने गणेशोत्सव सण साजरे करण्याकडे वळले आहेत हे फार मोठे ग्रीनफ्रेंड्सचे यश आहे असे सांगितले.त्याचवेळी त्यांनी इकोफ्रेंडली गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीने,ऑईल पेंटने याशिवाय निर्माल्य तलावात टाकण्याने पाण्यातील सजीव घटक नष्ट होऊन प्रदूषित होतात याची इत्यंभूत माहिती सोदाहरणासहित दिली.सहभागी विद्यार्थ्यांनी सुद्धा साधी मातीची मुर्ती तयार करून ऑइल पेंटने न रंगविता जलरंगाने रंगवून आणले व सभोवताल पर्यावरण संदेश देणारा देखावा तयार केले व घोषवाक्ये लिहिली.

       या स्पर्धेत क.महा. गटात प्रथम क्रमांक ओंकार मंगल चाचेरे याचा तर द्वितीय क्रमांक मंथन घनश्याम चाचेरे याला प्राप्त झाला.हायस्कूल गटात सृष्टी राजेंद्र वंजारीला प्रथम तर चैतन्य वंजारीला द्वितीय क्रमांक देण्यात आला. मिडलस्कुल गटात श्रीनय चाचेरे याला प्रथम तर मयंक चाचेरे याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.प्रोत्साहनपर क्रमांक ओंकार आगलावे,वेदांती वंजारी व अर्णव गायधने,आराध्या आगलावे यांना प्राप्त झाला.

       स्पर्धेचे परीक्षण ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे अध्यक्ष अशोक वैद्य, सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार,ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे,मंगल खांडेकर, अशोक नंदेश्वर ,दिलीप भैसारे यांनी केले.

         कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने, नेचर पार्कच्या सौदर्यीकरण्यासाठी सतत् झटणारे लाखनी नगरपंचायत सदस्य संदीप भांडारकर,सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे,अशोका बिल्डकाँनचे पर्यवेक्षक अभियंता नितेश नगरकर, मुंबई इनस्पेक्टर नेताराम मस्के,गुरुकुल आयटीआय प्राचार्य खुशालचंद मेशराम, कृषीनिष्ठ व वनौषधी शेती पुरस्कर्ते इंजि. राजेश गायधनी ,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे वाइल्ड लाइफ रेस्क्यूअर पंकज भिवगडे, मयुर गायधने, सलाम बेग,विवेक बावनकुळे,धनंजय कापगते, गगन पाल,नितीन निर्वाण,योगेश वंजारी,खेमराज हुमे,निलेश भैसारे ,मनीष बावनकुळे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.