ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मंगल कार्यालयासठी शालेय पटांगणच हडपले…. — जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा,” बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकास, महत्वाचा नाही काय?… — कर्तव्याची असीही अमान्य कार्यपद्धत विद्यार्थ्यांच्या मुळावर वार करणारी…

 

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि

 

सिंदेवाही:-तालुक्यातील वासेरा गावातील ही घटना आहे.वासेरा गावात इयत्ता 1 ते 7 वी पर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे.शालेय विद्यार्थी म्हटलं तर त्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक विकास सुद्धा महत्वाचा आहे व त्यांना शारीरिक शिक्षण सुद्धा आवश्यक आहे.

            शालेय विद्यार्थ्यांच्या बौध्दिक,शारिरीक,विकासासाठीसकारात्मक दृष्टीकोन बाळगणे ग्रा.पं.सरपंच,उपसरपंच व सदस्य यांना वाटणे अत्यावश्यक होते.पण त्यांनी गावातीलच शालेय मुलांच्या बौध्दिक व शारिरीक विकासावरच आघात करण्याच्या दृष्टीने स्थानिक जि.प.उच्च.प्राथमिक शाळेत क्रिडा पटांगण हडपले काय?याबाबत वासेरा गावातील नागरिकांत चर्चेला पेव फुटले आहेत.

             वासेरा ग्रा.पं.प्रतिनिधींचे मुलं हे कॅन्व्हेंट मध्ये शिक्षण घेतात म्हणून शाळेचे क्रिडा पटांगण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हडपले काय?असा प्रश्न सुद्धा सकारात्मक भुमिके साठी.

              ज्या ग्रामस्थांची मुले जिल्हा परिषद शाळेत आजही शिक्षण घेऊन आपलं भवितव्य साकारण्याची अपेक्षित तयारी करत आहेत.त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या सोयींचा विचार करण्यासाठी आज ग्रामस्थांनी निवडून दिलेला एकही प्रतिनिधी दिसत नाही.

             अर्थातच ग्रामस्थ्यांचे मुले उतंम शिकावेत,क्रिडा क्षेत्रात नामवंत व्हावेत याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे अगदी जवळचे हृदयस्पर्शी नाते त्यांच्या सोबत सदैव असणे गरजेचे आहे.

           त्यांना शिक्षणाच्या व शारिरीक विकासावर भर देणाऱ्या सोयी व्यवस्थित उपलब्ध करुन देणे सुद्धा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहेत.मुलांच्या भविष्या पुढे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना मंगल कार्यालय अत्यावश्यक असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.

              अनेक वर्षांपासून या शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळण्या बाळगण्यासाठी शालेय पटांगण होते व गावातील गुरे जमा करण्याची जागा होती.तसेच पशु वैद्यकीय दवाखान्यासाठी शासकीय नोंदीनुसार जागा जिल्हा परिषद शाळेसमोर राखीव होती.

              मात्र,वासेरा येथील ग्रा.पं.प्रतिनिधींनी तिथे मंगल कार्यालय काम सुरु केले आहे.त्यामुळे शालेय विद्यार्थांना खेळण्यासाठी जागाच उरलेली नाही.हा एक प्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाला चालणा देणाऱ्या बाबीवर अन्याय व अत्याचार झाला असून त्याच्या न्यायासाठी एकही लोक प्रतिनिधी बोलतांना दिसत नाही ही वासेरा ग्रामस्थांसाठी खूप मोठी शोकांतिका ठरत आहे.

               भविष्यात गोर गरिबांचे मुलं पटांगनावर खेळतांना बघून माझे भावंड शाळेत छान खेळतात.हे दृश्य बघून जिल्हा परिषद शाळेकडे आकर्षित व्हायचे.त्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण व्हायची.पण तेही दृश्य अदृश्य होण्याच्या मार्गांवर आहे.

               याकडे जिल्हा परिषद चंद्रपूर मुख्य कार्यकारी अधिकारी,पं.स.सिंदेवाही गट विकास अधिकारी यांनी गांभीर्याने वेळीच लक्ष देणे गरजेचे भासत आहे. 

              ग्रा.पं.प्रतिनिधींना ते चुकीचं वाटतं तर इमारत बांधकामाचे भूमिपूजन करतांना किंवा इमारत बांधकामाची परवानगी नाकारायचं ग्रा.पं. प्रतिनिधींना का जमलं नाही ? असा प्रश्न समस्त ग्रामस्थ विचारत आहेत.

*****

कोट…

      तिथं सभागृह बनत आहे हे चुकीचंच आहे.पण काम पूर्ण झालं आहे.आत्ता आपण काही करू शकत नाही.

     रवींद्र बोरकर

अध्यक्ष शा.व्य.स.वासेरा.

***

कोट..

        सदर काम जुन्या बॉडीने प्रस्तावित केलेले आहे.सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे ते काम त्या जागेवरून दुसरीकडे स्थलांतरीत करता आले नाही.खरं तर शालेय विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे.

  निशांत बंडीवार..

ग्रा.पं.सदस्य वासेरा.

***

कोट..

        ग्रा.पं.प्रतिनिधी काहीही करू शकतात काय?गावात सैराटपणे बियर बार् सुद्धा चालू केली आहे.त्यांना ग्रामस्थांच्या विचारांशी व हितांसी काही देणे घेणे नाही.

ग्रामस्थ वासेरा.

****

कोट..

        माझा विरोध होता.मी ते बांधकाम दुसरीकडे करण्यासाठी प्रयत्न केला.पण बाकी ग्रा.पं. सदस्यांनी विरोध दर्शवीला नाही.

      महेश बोरकर

  सरपंच,ग्रा.पं.वासेरा.

****

कोट..

         बांधकामासाठी त्यांनी चुकीची जागा निवडली.त्या जागेत सभागृह व्हायला नको होते.

हेमंत सूर्यवंशी..

माजी अध्यक्ष तं.मु.स.वासेरा.