विस्तीर्ण नदी बेफाट
धावते धुंद सैराट
मी उभा तिच्या गा काठी
मनी हर्षानंदी दाटी
नदी जीवन सळसळ न्यारी
जगी भरते हिरवळ भारी
मी उभा तिच्या गा काठी
मन अतुर मारण्या मिठी
नदी अवखळ खळखळ नाद
वायू घाली तिजला साद
मी उभा तिच्या गा गाठी
अनुभवतो फुलांची वृष्टी
नदी मायाळू लडिवाळ
करी सकळांचा सांभाळ
मी उभा तिच्या गा काठी
लई नटली सारी सृष्टी



