रोखठोक
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
२०२४ ला आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी दरवर्षी प्रमाणे रक्षाबंधनाचा कार्यक्रम चिमूर व नागभिड येथे घेतला होता.या रक्षाबंधन कार्यक्रमाच्या निमित्ताने नासिकाबाई नावाच्या महिलेला त्यांनी चंद्रपूर जिल्हा दारुबंदी करण्याचे आश्वासन देताना कांग्रेस पक्षाच्या माजी मंत्र्यांवर व तात्कालीन राज्य सत्तेवर आगपाखड केली होती.
याचबरोबर चिमूर विधानसभा मतदारसंघात कुठेही अवैध दारु विक्री सुरु असल्यास मला फोनद्वारे कळवा,मग मी बघून घेतोय असे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया हे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमातच हजारो भगिनीं पुढे बोलले होते.
नासिकाबाई या कुठल्या गावच्या आहेत हे मलाही माहित नाही..पण,त्यांची मागणी ही हजारो कुटुंबांना दिलासा देणारी होती की बरबाद करणारी होती,हे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना कल्पना आहेच..
अँड.पारोमीता गोस्वामी यांनी हजारो महिला-षुरुषांच्या सहकार्याने चंद्रपूर जिल्हा दारु मुक्त व्हावा यासाठी चिमूर ते नागपूर असा मार्च काढला होता.तात्कालीन मंत्री व आताचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सत्तेचा सदोपयोग करीत चंद्रपूर जिल्ह्यात दारु बंदीचा निर्णय घेण्यासाठी सकारात्मक कृती केली होती.
पण,दारुबंदी काळात सुध्दा चंद्रपूर जिल्ह्यात दारुचा व्यवसाय दाबून चालवला गेला होता व जिथे दारु मिळत नव्हती तिथे सुध्दा अवैध दारु विक्रेत्यांनी देशी-विदेशी दारु पोहोचवली होती हे सत्य अजूनही चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक विसरु शकले नाहीत.
५० रुपाची दारु १०० रुपयाला आणि कधीकधी २०० रुपयांपर्यंत गेली होती.यात सर्व मद्यपींचे भयंकर नुकसान झाले होते आणि याच कारणांमुळे हजोरो कुटुंबियांची परवड झाली होती.
मात्र,चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी काळात बऱ्याच संबंधित अधिकाऱ्यांचे आणि राजकीय पक्षांच्या स्थानिक प्रमुखांचे बऱ्याचअंशी हात ओले झालेले असावेत हे नाकारताही येत नाही..
दारुबंदी काळात चंद्रपूर जिल्ह्यातील लाखो आयाबहिणींची- पुरुषांची झालेली आर्थिक परवड हे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना माहिती नाही काय?
परत्वे दारुबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या विकास कामांवर बराच परिणाम झाला होता व विकास प्रक्रिया ठप्प पडली होती याची जाणीव आमदार किर्तीकुमार भांगडीया बरोबर जिल्ह्यातील नागरिकांना आहे..
याचबरोबर काही लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार/आमदार हे स्वत:च्या हिताचे भांडवल करताना केव्हा काय शब्द बोलून जातील हे सांगणे कठीणच काम आहे.
तद्वतच मतदारांना शब्दांच्या मोह फासात अडकवून वेळ मारुन नेने व त्यांना खेळवत ठेवणे हा एक भांडवलाचाच भाग आहे.म्हणजेच सार्वजनिक रित्या बोलताना कुठल्या शब्दात फायदा व तोटा आहे याची माहिती बऱ्याच खासदार व आमदारांना आहे असेच म्हणावे लागेल.
नासिकाबाईला दिलेल्या शब्दाला १ वर्ष झालाय.पण,आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी सत्ता असताना चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केली नाही.कुठल्याही कार्यक्रमांतर्गत शब्दांचा छल व खेळ पुढे येतोच हा निसर्ग नियम आहे व याचबरोबर कृत्रिम वास्तव आहे!
परंतु आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना वास्तव प्रश्न हा आहे की,चिमूर विधानसभा मतदारसंघात अवैध दारु व्यवसाय सुरू नाहीत काय? अवैध सट्टा व्यवसाय सुरू नाहीत काय? आणि चिमूर तालुक्यात वेशा व्यवसाय डोके वर काढणार नाही यासंबंधाने ते जातीने लक्ष देणार आहेत काय?
याचबरोबर किर्तीकुमार भांगडीया हे आमदार होण्यापूर्वी अवैध व्यवसायीकांवर पोलिसांचा धाक होता,तो आताच्या काळात राहिलेला नाही,याला जबाबदार कोण आहेत? आणि अवैध व्यवसाय कुठे सुरू आहेत याची माहिती आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना कशी काय मिळत नाही? या प्रश्नानाला अनुसरून आता लोकचर्चेचा विषय बनला आहे..
याचबरोबर कुठल्या देशी दारुच्या दुकानातून नियमबाह्य देशी दारूचा पुरवठा ग्रामीण भागातील गावात केला जातो या संबंधाने पोलिस विभागाला माहिती कशी काय नाही? गाव तेथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते असताना आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या पक्ष पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अवैध व्यवसायाची माहिती खरोखरच नाही काय? असे प्रश्न आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना अधिकच गंभीर करीत आहेत असे दिसून येते आहे.
आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करायची नाही याबाबत कदाचित त्यांनी विचार केला असेल.याचबरोबर अवैध व्यवसाय बंद करायचे नाही असेही कदाचित त्यांचे बाह्य धोरण असेल? याची पुष्टी म्हणजे त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळातच चिमूर विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त अवैध व्यवसाय सुरू झाले आहेत आणि अवैध व्यावसायिक मुजोरी करु लागले आहेत.
अवैध व्यवसाय,अवैध व्यवसायीकांची मुजोरी व दारु पुरवठादार कोण आहेत,हे सगळ चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत आणि चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक हे बैलबुदू आहेत असेही म्हणता येणार नाही.
पण,आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा प्रश्न आहे,”खरोखरच,परत चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी होणार काय?



