बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
पुणे परिसरातील धरणातून उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे उजनी धरणातून भिमा नदीत एक लाख 40 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. भिमा नदीवरील तीन बंधारे बुडाले तर गणेशवाडी पुलावर पाच फुट पाणी वाहत असल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
तर वीर धरणातून नीरा नदीत 54760 क्युसेसचा विसर्ग होता आज दिनांक 21 आगस्ट रोजी विसर्ग कमी करून 15,324 एवढाच निरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग चालू आहे.
भिमा नदीवरील बंधारे व पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नदी काठावरील इंदापूर, माढा व माळशिरस तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे. नरसिंहपूर येथील संगमावर एक लाख 93475 हजार क्युसेचा विसर्ग वाहत आहे.
पुणे परिसर व घाट माथ्यावर तुफान पर्जन्यवृष्टी चालू असल्याने वरील धरणातून एक लाख 60 हजार क्योसेस मोठ्या प्रमाणात पाणी उजनी धरणात सोडले जात आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या वर असलेल्या 19 लहान व मोठ्या धरणातून पाणी उजनीत येत आहे.
त्यामुळे उजनी धरणातून भिमा नदीत एक लाख 93475 हजार क्युसेसने पाणी सोडण्यात येत असून त्यामध्ये वरील पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे पाणी पातळी वाढणार नाही असीही माहिती उजनी धरण नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे.
मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट पासून पाण्याची वाढ करून एक लाख 93475 हजार क्युसेस करण्यात आले आहे. उजनी धरणातून भिमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे भांडगाव, टणू, नरसिंहपूर येथील बंधारे व गणेशवाडी गारअकोले यांना जोडणारा पुल पाण्याखाली गेला आहे.
परंतू वरून येणाऱ्या पाण्यात वाढ असल्याने पुलावरून जवळपास पाच ते सात फुट पाणी वाहत आहे यावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. नागरिक पुलाच्या दोन्ही बाजूला नदीवरील पाणी पाहण्यासाठी गदीं करताना दिसत आहेत.
विर धरणातून नीरा नदीत 15324 क्युसेस पाण्याचा विसर्ग वाहत आहे. भीमा व नीरा नदीला पूर सदृश्य परस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असा इशारा जलसंपदा विभाग सोलापूर, धरण नियंत्रण विभाग भिमानगर, धरण नियंत्रण विभाग निरा खोरे विर धरण व उजनी पूर नियंत्रण विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नरसिंहपूर-संगम व नरसिंहपूर-शेवरे पुलावरून वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे. कोंडार पट्ट्यातील गावातील विद्यार्थ्यांना गणेशवाडी पुलावर पाणी आले असल्याने शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. नदी काठावरील शेतातील पिकात पाणी घुसल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत.
उजनी धरणातून भीमा नदीत पुर नियंत्रणासाठी पाणी सोडले जात असल्याने गणेशवाडी गारअकोले पुल एका महिन्यात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. परंतू सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस, तलाटी, पोलिस पाटील असे कोणीही हजर नसल्याने नागरीक पुलावरील पाण्यात धोकादायक पणाने घुसून जिव धोक्यात घालत आहेत.



