भद्रावती इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा थाटात… — अध्यक्ष स्वाती चारी तर सचिवपदी प्रेमा पोटदुखे.. 

 

उमेश कांबळे 

ता.प्र.भद्रावती :- 

       इनरव्हील क्लब भद्रावती ने पदग्रहण सोहळा आयोजित करून मोठ्या थाटात पार पडले. सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

              त्यानंतर इनरव्हील क्लब माजी अध्यक्ष सुनिता खंडाळकर यांनी स्वाती चारी यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक सेक्रेटरी रमा गर्ग उपस्थित होत्या.

           इनरव्हील क्लबचे आउटगोइंग मेंबर सुनीता खंडाळकर सचिव मनीषा ढोमणे उपस्थित होते.या कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली,त्यामध्ये अध्यक्ष स्वाती चारी,सचिव प्रेमा पोटदुखे,आयएसओ तृप्ती हिरादेवी,ट्रेजारर वैशाली तेलंग,सी.सी.रश्मी भिसे, आदींचा समावेश आहे.

      या कार्यक्रमाचे संचालन विश्रांती उराडे यांनी केले.तसेच डिस्टिक सेक्रेटरी रमा गर्ग मॅडम यांच्या विषयी माहिती प्रेमा पोटदुखे यांनी दिली.

         या कार्यक्रमात उपस्थित असलेले वंदना धानोरकर, कीर्ती गोहणे, कविता सुफी, कीर्ती आखाडे, विभा बेहेरे, वर्षा धानोरकर तसेच हटवार मॅडम ,शुभांगी बोरकुटे, राजश्री बत्तीनवार, आशा कौशल उपस्थित होते.