सामान्य नागरिकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून भाजप काम करत आहेत : प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर…  — श्रीक्षेत्र आळंदी येथे लाभार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : सर्व समाजातील नागरिकांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी सामान्य नागरिकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करत आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत योजना पोचविण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते काम करीत आहेत, अशा भावना भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी व्यक्त केल्या.

        केंद्रातील मोदी सरकारला यशस्वी नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आळंदी शहरात ‘मोदी@9 जनसंपर्क अभियान’अंतर्गत ‘लाभार्थी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन आळंदी येथील साईराज मंगल कार्यालय येथे करण्यात आले. महा – जनसंपर्क अभियान मोदी @9 अंतर्गत भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी श्रीक्षेत्र आळंदी येथे लाभार्थी संवाद मेळाव्याप्रसंगी उपस्थित लाभार्थ्यांना संबोधित केले. यावेळी संपूर्ण आळंदी शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

       यावेळी आमदार महेश लांडगे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य डॉ.रामशेठ गावडे पाटील, अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, शांताराम भोसले, प्रदीप कंद, संदीप भोंडवे, धर्मेंद्र खांडरे, अनुप मोरे, प्रिया पवार, सुदर्शन पाटसकर, संचालिका क्रांतीताई सोमवंशी, किरण दगडे, पांडुरंग ठाकूर, काळूराम पिंजन, नगरसेवक पांडुरंग वहीले, अशोक उमरगेकर, सुनिता रंधवे, रुक्मिणी कांबळे, ॲड.सचिन काळे, शहराध्यक्ष ॲड.आकाश जोशी, आनंद वडगावकर, कल्पनाताई गवारे, मनिषाताई ढोणे, गणेश साडभोर, अमोल वीरकर, माऊली बनसोडे, मंगल हुंडारे, संगीताताई फफाळ, यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.