मारदा – मोहगांव – केळीगट्टा रस्ता नव्हे पायवाटच… — आमदार व लोकप्रतिनधींचे दुर्लक्ष… — रिपाई व गोंगपा आंदोलन छेडणार…

ऋषी सहारे

संपादक

            गडचिरोली- तालुक्यातील पोटेगांव सर्कल मधिल मारदा, मोहगांव व केळीगट्टा ६ कि.मी. चा अतिदुर्गम भागातील रस्ता नव्हे पायवाटच वरून फोर व्हिलर सोडाच टु व्हिलर चालवणे कठीण झाले आहे. सदर रस्त्याची दुर्दशा बघता रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर, गोंगपाचे प्रशांत मडावी , युवा नेते दिनेश मडावी,मारदा चे सरपंच मनोहर पोटावी, रिपाई पोटेगाव सर्कल प्रमुख मुजुमकर व गावकरी यांनी रोडची प्रत्यक्ष पाहनी केली असता रस्त्याची वाईट परिस्थिती आहे. फोर व्हिलर सोडाच टु व्हिलरही चालवणे कठीण आहे. पावसाळ्यात रस्ताच बंद असतो निवडणूकीत भाजपा, कांग्रेस चे उमेदवार येतात व केवळ आश्वासनच देतात . नुकताच पोटेगांव येथे राजस्व अभियान राबविले त्यात रस्ताविषयी तक्रार केली परंतु ती हवेतच विरली. – – सदर रस्ता जिल्हा परिषद गडचिरोली अर्तगत येतो . गेल्या दहा वर्षात सदर रस्त्याची कामे गोटेफोडे अभियंता , दातार अभियंता, चव्हाण अभियंता यांनी सदर रस्त्याचे काम कागदोपत्री दाखवून अनुदानच हळप केले अशी चर्चा आहे . त्याची योग्य चौकशी केल्यास घबाड बाहेर येइल . त्यांनी रस्त्यावर फक्त मोठ्या पायल्या टाकून ठेवल्या व रस्याचे काम झाले असे दाखवून संपूर्ण अनुदानच हळप केले. त्या रस्यावर फुटलेल्या पायल्या आजही आहेत परंतु रस्तच गायब आहे . मारदा पुढे एक कलवट बाधले की बंधारा कळायला मार्गच नाही. यावर्षी काम सुरु होणार म्हणुन फाये इंजिनिअर गावकन्यांना सागुन गेले परंतु अजुनही रस्त्याचे काम सुरु झाले नाही. सदर परिसरातील ग्रामपंचायतने ठराव घेऊन आमदार _ खासदार यांचेकडे तक्रार दिली पण व्यर्थ, सदर परिसर हा कांग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळें भाजप आमदार लक्ष देत नाही अशी गावकऱ्याची ओरड आहे. येत्या १५ दिवसात रिपाई – गोगपा आदोलन करण्याचा तयारीत आहेत.