सुजाण नागरिकांनो मतदानाला जातांना हे विसरू नका…… 

    “आमच्या देशात कोरोनाची लाट 2020 मध्ये आली होती. त्याचबरोबर अमेरिकेत सुद्धा आली होती.अमेरिकेने लॉकडाऊन नाही केले,पण आमच्या सरकारनी केले.त्या काळात आमचे वडील,आमची आई,आमचा भाऊ,आमची बहीण,आमची पत्नी,आमची मुलगी,आमचा मुलगा,कुणालाही थोडी जरी शंका आली की,सरकार जबरदस्तीने दवाखाण्यात ऍडमिट करून घेऊन त्यांना पॉसिटीव्ह करून ( नसला तरी ) घेऊन अगदी त्या जिव्हाळ्याच्या नात्याला भेट सुद्धा घेऊ दिली नाही…….

         तोंडही शेवटचे न पाहू देता परस्पर स्मशानात जाळताना आमचा जीव काय म्हणत होता…………..

         याच कोरोनाच्या महामारीच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून 109, 110, 111 आणि 112 या अनुच्छेदातून प्रसंगी कर्ज काढण्याची मुभा केंद्र सरकारला दिलेली आहे. 

         म्हणून याच केंद्र सरकारने पी.एम.फंडात पॆसे जनतेकडून जमा करून घेतले,भांडवली बाजारातून कर्ज उभारले,RBI कडून जबरदस्तीने 171000 कोटी रुपये घेतले.आणि याच कोरोनाच्या नावाखाली काढलेल्या कर्जातुन स्वतःचेच ( खासदारांचे ) प्रत्येकी 40, 000/- रुपये मानधन वाढवून घेतले…….!

    ही घटना मतदानाला जातांना विसरू नका….. 

         याच कोरोनाच्या नावाखाली आमच्या देशातल्या अनेक महापालिका प्रशासकांच्याच हातात आहेत.गेल्या 3/4 वर्षांपासून निवडणुका घेतल्या जात नाहीत….

 याचे कारण काय असू शकते..?लोकशाही संपविण्याचा तर हा प्रकार नाही ना…..!

     एवढेच काय,कृत्रिमरित्या वाढणाऱ्या महागाई,बेरोजगारीमूळे केवळ जगण्याची धडपड आमची केविलवाणी झालेली असतांना आम्ही केवळ उद्याच्या आशेवरच जिवंत आहोत,की उद्याचा दिवस तरी चांगला निघेल,उद्याचा दिवस तर त्यापेक्षाही घातक निघत आहे.तरी सुद्धा आम्ही परवाची आशा जिवंत ठेवतो.

        या सर्वावर उपाय म्हणून जो आमच्या हातात पाच वर्षातून मिळणारा मताचा अधिकार होता……

        तो सुद्धा या व्यवस्थेने EVM द्वारे हिरावून घेतला……!!!!!!!!!!

     आता आम्ही ( जनता ) यांच्यासाठी केवळ औपचारिकता म्हणून उरलो………….

       पण तरी सुद्धा मतदान करावच लागेल आणि ते करूया….. 

   ते करत असतांना मात्र वरील 10 वर्षातल्या दुःखाच्या गोष्टी विसरू नये.

    येथील व्यवस्था सर्वोच्च न्यायालयासहित,मुख्य निवडणूक आयोगासहित एवढी मुजोर का झाली असेल,जी की जनतेची साधी मागणी होती की,बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात………

      काय डोंगर कोसळणार होता EVM हटविले तर……….

       एवढेच काय मा.राष्ट्रपतींनी सुद्धा बघ्याची भूमिका घ्यायला नको होती……..!

      मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या आरोपीला माफी देण्याचा जसा संविधानिक अधिकार आहे………

      तसाच हाही अधिकार होताच की,जनतेची मागणी आहे EVM हटवा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या म्हणून आदेश देण्याची………!

       असू द्या,तुम्हालाच नवीन संसदेच्या उदघाटनाला बोलावलं नव्हतं…तुमचं तरी काय चालणार म्हणा……?

    शेवटी वरील गोष्टी न विसरता मताचा अधिकार वापरू नये, तेंव्हाच आपण काहीतरी उद्याची आशा जिवंत ठेऊ……… 

       कारण, शइंग्लंडमध्ये दोनच पक्ष आहेत,हुजूर आणि मजूर पक्ष याचे पाच वर्षे झाले की त्याचे पाच वर्षे होतात,परंतू इथे मात्र एकाच पक्षाचे,एकाच व्यक्तीच्या नेतृत्वाखाली अब की बार 400 पार म्हणून तिसऱ्यांदा सरकार आणण्याचा जो प्रयत्न आहे…………

      हा प्रयत्न जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन केला असता तर…….

    कोन कितने पाणि मे तुरंत समझमे आता था……..!

 म्हणूनच…….

 वरील बाबी न विसरता संविधानविरोधी शक्तीला संपबिण्यासाठीच मताच्या अधिकाराचा वापर करु…… 

              आवाहनकर्ता

              अनंत केरबाजी भवरे

 संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689