निसर्गातील अन्नसाखळीमध्ये चिमणी हा महत्त्वपूर्ण पक्षी आहे :- सौरभ जवंजाळ

युवराज डोंगरे

   उपसंपादक

खल्लार :- छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा सामाजिक शास्त्र विभाग व सि ए आर एस यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. इंदिराबाई बाबाराव कडू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस व पक्षाकरीता जलपात्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला. 

           या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौरभ जवंजाळ उपस्थित होते. महाविद्यालयामध्ये दरवर्षीच 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना जलपात्र वाटप करण्यात येते. उन्हामुळे व पाण्याअभावी अनेक पक्षांचा मृत्यू होतो. अन्नसाखळीमध्ये पशुपक्षी हे अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असतात. त्यामध्ये समतोल राखण्यासाठी चिमणी हा पक्षी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो.

           चिमणीच्या संवर्धनासाठी त्यांची पाण्याची व्यवस्था करणे, झाडे लावणे, घरामध्ये घरटी उभारणे या माध्यमातून आपण चिमणीचे संवर्धन करू शकतो निसर्गामध्ये समतोल राखण्यासाठी हा पक्षी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो असे प्रतिपादन सौरभ जवंजाळ यांनी केले.

          या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रवींद्र इचे, कार्यक्रमाचे आयोजक डॉ प्रविण सदार , डॉ. आशिष काळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ प्रविण सदार, संचालन विवेक धाकडे व आभार प्रदर्शन कु. निकिता कैतवास यांनी केले. या कार्यक्रमासाठी रोशन प्रजापती, अतुल सोळंके, बादल, कु. पूजा भटकर. कु. धनश्री देशमुख तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.