वादळ-गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – सदाराम नुरुटी माजी पंचायत समिती सदस्य यांची मागणी…

ऋषी सहारे

   संपादक

         ‌‌छत्तीगड सिमेंवर व महाराष्ट्च्या टोकावर कोरची तालुक्यात दिनांक 19 माचऀ 2024 मंगळवारला रात्रो 8.30 वाजता आकस्मिक गारपीटी सह आलेल्या वादळी पावसामुळे कोरची तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उप प्रादेशिक कार्यालय कोरची अंतर्गत 14 आदिवासी धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. त्या 14 धान्य खरेदी केंद्रावरती उघडयावर धान्य त्ताळपतळी झाकुन आहे. परतु काही ठिकाणी वरून पाणी जावुन धान्य भिजवलेले आहेत.शेतकर्याचे धान,विटा भट्टी,मका ,भाजीपाला अन्य पीक पूर्णतः उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला गेला आहे .त्यामुळे नुकसानग्रस्त शेत पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य सदाराम नुरुटी यांनी केली आहे.

    कोरची तालुक्यात बेतकाठी, कोटगुल, कोटरा,भिमपुर,बोरी,कैमुल,कोरची,गँरापती, मसेली,अल्लीटोला,झगवाही,नांगपुर,कोसमी, बेडगांव ,मकेँकसा, व तालुक्यातील ईतर गावांमध्ये काल रात्री अचानक गारपीट व वादळी पावसाने शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्याला शासनाच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी सदाराम नुरुटी पंचायत समिती सदस्य यांनी‌ केली आहे.        ‌‌