सावलीच्या पोलीस अधिकाऱ्यावर झाला फुलांचा वर्षाव… — उत्तम अधिकारी क्वचितच,सहृदय निरोप..

      सुधाकर दुधे

तालुका प्रतिनिधी सावली

     पोलीस विभाग म्हटल कि अनेक व्यवस्थेतंर्गत आजही उलटेसुलटे विचार मांडल्या जातात.अशात कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी असला कि समाजातील हिच मंडळी त्यांना डोक्यावर घेउन नाचवितात,त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करतात.होय याचा प्रत्यय नुकताच चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीच्या ठाणेदाराबाबत आला.प्रसंग होता त्यांच्या निरोप समारंभाचा.एका पोलीस अधिकाऱ्याला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देतांना त्यांनी फुलांचा वर्षाव करित आपल्या लाडक्या अधिकाऱ्याबाबत सहृदय कृतज्ञता व्यक्त केली.

      लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर चंद्रपूरचे एस.पी.रविंद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या.त्यांनी एकून 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात.यात 2 पोलीस निरीक्षक,28 एपीआय व 35 पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.यामुळे जिल्ह्यातील पोलीस विभागात प्रचंड खांदेपालट झाला आहे.

          आशिष बोरकर हे गेल्या दोन वर्षापासून सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून कार्यरत होते.आपल्या कार्यकाळात त्यांनी कर्तव्याच्या पलीकडे जात सामाजिक औदार्य जोपासणारे कार्य केले.स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरूणांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.त्यांना उपयुक्त मदत केली.समाजातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखली.त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीला मोठा आळा बसला.चंद्रपूरच्या एसपींनी पोलीस विभागात खांदेपालट केले.अनं त्यांची बदली चंद्रपूर जिल्हा विशेष शाखेत झाली.

        त्यांच्या बदलीची माहिती कळताच सावली पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गावात एकच चर्चा सुरू झाली.एका प्रामाणीक पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली असल्याने अनेकांनी आपल्या सकारात्मक भावना व्यक्त केल्या.सावली पोलीस स्टेशन मध्ये त्यांना अतिशय भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला.

       नगरातील विविध घटकांतील नागरिक,तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांची त्यांच्या निरोप कार्यक्रमात गर्दी केली होती.यावेळी ठाणेदार आशिष बोरकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.याचसोबत फुलांचा वर्षाव करित त्यांना निरोप देण्यात आला.या सगळ्या प्रकारामुळे ठाणेदार आशिष बोरकर अक्षरशः भारावून गेले.

         त्यांनी सावली तालुक्यातील नागरिकांचे मनस्वी आभार मानले.सावलीकरांनी दिलेले प्रेम आपण विसरू शकणाार नाही असे सांगत यातून पुन्हा नव्या दमाने सकारात्मतेने काम करण्याची आपणास मोठी प्रेरणा मिळाली असल्याचे मनोगत व्यक्त केले.

       प्रशासनात काम करतांना आपल्या कर्तव्याच्या पलीकडे समाजासाठी काम करणाऱ्यांची चौफेर वाणवा आहे.पण काही अधिकारी असे असतात कि जे समाजाच्या हितातच आपले हित बघतात.सावलीचे ठाणेदार आशीष बोरकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून त्याचा परिचय दिला आहे.एका पोलीस अधिकाऱ्याला फुलांचा वर्षाव करित त्यांना निरोप दिल्याच्या या प्रकाराची चर्चा संपुर्ण जिल्ह्यातील पोलीस खात्यासह प्रशासनात होत आहे.