वाघ घुसला गावात,डरकाळीने हादरले नागरिक.‌. — दामोधर दडमल यांच्या गायीला केले ठार.. — चिमूर तालुक्यात जिकडे तिकडे वाघांची दहशत..

दिक्षा कऱ्हाडे

 वृत्त संपादिका 

          वाघाची दहशत जिकडे तिकडे आहे.शेतकऱ्यांचे व नागरिकांचे जगणे मुश्कील केले आहे.काही ठिकाणी तर वाघांनी जाण्यायेण्याचे मार्ग सुध्दा बंद केले आहेत.

            असे असले तरी हल्लेखोर वाघांच्या दहशतीवर वन विभागाला नियंत्रण आणणे अजूनपर्यंत जमले नाही.यामुळे दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक कामे करावी कसे या विवंचनेत नागरिक आहेत.

           वाघ म्हणजे निर्भिड वन्य प्राणी?ज्याचा धाक सर्व नागरिकांना व जंगली प्राण्यांसह पाळीव प्राण्यांना आहे.वाघ दिसला की सर्वांची दांडी गुल होते व जिव वाचविण्याच्या प्रयत्नात मनुष्यप्राणी आणि इतर सर्व प्रकारचे प्राणी सैरावैरा पळू लागतात.जिव तर वाचविणे आवश्यकच असते.

            मात्र,गोठ्यात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर वाघ जेव्हा हल्ला करतो,तेव्हा त्याच्या तावडीतून सुटका करून घेणे अवघड असते.यामुळे वाघाच्या हमल्यातंर्गत आयुष्याचा अंतीम क्षण आला आहे असे सर्वांनी समजून जावे लागते.

            अशीच घटना १९ डिसेंबरच्या रात्रोला आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान घडली.

         गोठ्यात बांधून असलेल्या दुधाळू गायीसह इतर बैलावर वाघाने हल्ला करून एका गायीला ठार केले व गोठ्यातून ओढत नेऊन आपली भूक शमविण्याचा प्रयत्न केला.

           वाघांनी गायीवर हल्ला केला असल्याची माहिती गावकऱ्यांना होताच गायीला वाचवण्यासाठी हातात टार्च व लाठ्या घेऊन घटना स्थळाकडे गावकरी निघाले.मात्र नागरिकांच्या आवाजाने हल्लाखोर वाघांनी जागा सोडली होती.

        गावातील नागरिक जागे असतांना व शेजारी धान काढणारी मशीन सुरू असताना वाघ गोठ्यात घुसून पाळीव प्राण्यांवर हल्ला करतो म्हणजे सदर वाघ खूप धिट आहे असे समजावे लागेल.

            चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव येथील घटना असून श्री.दामोधर गणपत दडमल यांच्या दूधाळू गायीला वाघाने ठार केले असून बैलाला जखमी केले.यात श्री.दामोधर दडमल यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

           वनविभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी रात्रोलाच घटना स्थळाकडे धाव घेतली व वास्तव परिस्थिती प्रत्यक्ष बघितली.मात्र घटनेचा स्थळ पंचनामा आज होण्याची शक्यता आहे‌.

             मौजा कोटगावच्या आजूबाजूला नेहमी वाघांचा वावर असून हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क होणे आवश्यक आहे‌