बाळासाहेब सुतार
निरा नरशिंहपुर प्रतिनिधी
जोतपुरी बाबा ऊरुस निम्मीत कवाली गायनाच्या माध्यमातून काहीतरी कटकारस्थान रचून पोलीस अधिकारी यांची बदनामी होत असल्याचा लुमेवाडी ग्रामस्थांचा आरोप.
लुमेवाडी तालुका इंदापूर येथील हाजी हाफीज फत्ते मोहमंद जोतपुरी बाबांच्या ऊरूसा निमित्त दिनांक 14 सप्टेंबर संध्याकाळी 10 वाजता महाराष्ट्र भर गाजलेल्या कव्वाली जुगलबंदीचा कार्यक्रम घेण्यात आला.
हिंदू मुस्लिम भाई भाई हा संदेश भाविकान समोर कवालीच्या माध्यमातून बावडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी प्रशांत सलगर यांनी,चढता सुरज धीरे धीरे ही कवालीचे गोड आवाजात गायण केल्या बद्दल लुमेवाडी येथील भाविकांना मोठा आनंद झाला. मनुष जीवन आधारित कव्वाली असल्यामुळे आनंदाच्या क्षणामध्ये अधिकाऱ्यांनीच अधिकाऱ्याला ग्रामस्थांच्या वतीने बक्षीस देण्यात आले.
पोलीस अधिकारी जगन्नाथ कळसाई यांच्या हस्ते पोलीस अधिकारी प्रशांत सलगर यांना शंभर रुपयाचे बक्षीस.देण्याचा मान दर्गाह ट्रस्टीच्या वतीने दिल्यामुळे पोलीस जगन्नाथ कळसाईत यांच्यावर अनेक खोटारडे पणाचे आरोप होत आहेत.
हे सर्व आरोप खोठे आहेत,काहीतरी कटकारस्थान करून अधिकाऱ्याला बदनाम करायचे.असे कोण करीत असतील तर त्याचे नाव समोर आल्यावर त्याची जागा आम्ही दाखवून देऊ. असे दर्गा ट्रस्टीच्या वतीने माजी आदर्श सरपंच उस्मान शेख यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली.
उस्मान शेख पुढे बोलत असताना म्हणाले की,दर्गा ट्रस्ट व लुमेवाडी भावीकांच्या वतीने 32 वर्षापासून प्रत्येक वर्षी पोलीस अधिकारी यांच्या हस्ते कव्वाली टेजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन असते. बावडा पोलीस स्टेशनचे जगन्नाथ कळसाईत सर्व पोलीस पदाधिकारी यांचे कार्य चांगले असल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते कवालीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करूनच कार्यक्रम घेण्यात येत असतो.
सर्व धर्म समभावाचे प्रतीक जोतपुरी बाबा या भागाचे प्रसिद्ध देवस्थान असल्यामुळे सप्टेंबर दिनांक 13, 14, आणि 15 या तीन दिवसात महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरूनही लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठा उरूस साजरा होत असतो.
दर्गा ट्रस्टी यांची पत्रकार परिषद निमित्त सर्व दरगाह ट्रस्टी, लुमेवाडी गावचा जाणता राजा ट्रस्टी व माजी आदर्श सरपंच उस्मान शेख, रमजान जमादार, खुशालदिन शेख, शाहीअली शेख, विद्यमान सरपंच सुनील जगताप, जाकीर शेख तंटामुक्ती अध्यक्ष, सलीम शेख, नशीर शेख, मंजूर मुलानी, शिबिर काजी, शाबण सय्यद, दादाभाई शेख माजी उपसरपंच, आधी सर्व दर्गाह ट्रस्टी, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व लुमेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



