Home Political भाजपा आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाही करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र.. ...

भाजपा आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाही करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र.. — राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पदाधिकाऱ्यांतर्फे आमदार गोपिचंद पडवळकरांच्या विरोधात चंद्रपूर येथे जोरदार निदर्शने..

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

      भाजपचे आ.गोपीचंद पडळकर यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आ.श्री.जयंतराव पाटील यांच्या संदर्भात अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्य करतांना आ.जयंत पाटील यांच्या स्वर्गीय आई-वडिलांबद्दलही अपमानास्पद असे खालच्या पातळीवर वक्तव्य करून समाजात आ.जयंतराव पाटील यांची प्रतिमा डागाळण्याचे काम केले आहे.

       हा व्यक्ती असे वादग्रस्त वक्तव्ये वारंवार करून समजात तेढ निर्माण करीत आहे.आजच्या त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जयंत पाटीलांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे ! 

           आ.गोपीचंद पडळकर यांच्या अश्या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा त्यांचा यामागे डाव दिसतो आहे.

        यामुळे त्वरित आ.गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध नियमनुसार कारवाही करण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी जेष्ठ पदाधिकारी राजेंद्र वैद्य यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्हा पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

          याचबरोबर आ.गोपिचंद पडवळकर यांच्या विरोधात निषेध नोंदवतांना राजेंद्र वैद्य,मुनाज शेख,रोशन कोमरेड्डीवार,सुधाकर रोहनकर,राजेश मत्ते,संजय आस्वले,फयाज शेख,सबिया देवगडे,संजय कष्टी,प्रविन सिंग,अदनाशेख,जुनेद शेख,प्रशांत लांडगे,अजय कावळे,शुभम बागडे,बिपीन देवगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.