ब्रेकिंग न्यूज… — विज पडून एक महिला ठार तर एक जख्मी… — सिंदेवाही तालुक्यातील सिरकाळा येथील घटना…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधी

दखल न्यूज़ भारत

          सिंदेवाही तालुक्यातील सिरकाळा येथे विज पडून एक ठार दिनांक 20/9/2023 ला ठीक 1 वाजेच्या दरम्यान घटना घडली. तालुक्यात सध्या धान पिकाचे उत्पन्न घेणे सुरु असून धानपिकाचे काम करण्यासाठी पुरुष व महिला मजूर वर्ग मुठीत जीव धरून पोटाची खडगी भरण्यासाठी शेतीचे काम करण्यास जात आहेत.

             सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मौजा सिरकाडा येथील काही महिला प्रदीप यादव बोरकर रा. सिरकाडा यांच्या शेतात निंदन काढण्यासाठी गेले. मात्र निसर्गात अचानक बदल होऊन वीज कडकडाटा सहित पाण्याने रुद्र रूप धारण केल्याने महिला घराकडे जाण्यासाठी निघाले असता वीज पडून महानंदा मोतीराम अलोणे वय64 वर्षे (मयत ) रा. सिरकाडा या जागीच ठार झाली, तर रोशना प्रफुल गेडाम वय 35 वर्षे (जख्मी ) रा. सिरकाडा या गंभीर जख्मी झाल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे हलवले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

           तत्पूर्वी या घटनेची माहिती पोलीस स्टेशन सिंदेवाही ला मिळताच बिट अमलदार विनोद बावणे तसेच नागदेवते उपस्थित झाले असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.