रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात लवकरचं श्रीहरी चॅनल प्रस्तुत व श्रीहरी चॅनेल निर्मित तपोवन चित्रपटाला सुरुवात होणार आहे अशी माहिती तपोवन चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण सरदार यांनी दिली. हा चित्रपट सामाजिक आशयावरील असून यामधे विधवा महिलेचे जीवन कसे असते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये श्रीहरी चॅनेल संपादक तथा प्रसिद्ध मेकअपमैन अशोकजी वाघमारे ज्यानी अशी फसली नानाची टांग, मिलन दोन किनाऱ्याचे, बंडखोर, त्याग south movie, भोजपुरी फिल्म अम्मा तेरी कसम, सीरिअल कन्यादान, श्री संत रोहिदास महाराज , जय मल्हार,इत्यादी फिल्म मधे मेकअपमन म्हणून महत्वाची भूमिका पार पाड़ली आहे तेच तपोवन चित्रपटा मधील कलाकारांचे मेकअप करणार आहेत. यामध्ये सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून दीपाली जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . तसेच तपोवन चित्रपटा मध्ये सिने कलाकार म्हणून उज्वला रोडगे, आरती कदम, सुनील सूर्यवंशी,अनुराधा चव्हाण, पिंकी शेला, लता हरवाळकर,सुनील सूर्यवंशी, नरशिंग गुडसूरकर इत्यादी अनेक कलाकारांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती पत्रकारांशी बोलताना तपोवन चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण सरदार यांनी दिली.