Home Maharashtra धानाचे चुकारे, बोनससाठी काँग्रेसचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…

धानाचे चुकारे, बोनससाठी काँग्रेसचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

कोरची :- खरीप हंगाम 2025-26 मधील धान विक्रीचे चुकारे तात्काळ अदा करावेत, धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस द्यावा तसेच रब्बी हंगाम 2026 च्या ऑनलाईन प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, या मागण्यांसाठी आमदार रामदास मसराम यांचे कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दि २० मे रोजी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

        निवेदनात धानाचे चुकारे रखडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे नमूद करण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

       यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मनोज अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष रामसुराम काटेंगे, रविकुमार नंदेश्वर, मदन हिडामी, संपत धूर्वे, मेहतरू घाटघूमर, बस्तर होळी, राधेश्याम दरवडे, चमरू कल्लो, राजाराम नैताम, पुनाराम सोनवाणी, भिकम फुलकुवर, हेमकृष्ण सुवा, रमेश होळी, बाबूलाल शेंडे यांच्यासह शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.