Home Maharashtra पी एस आय संदीप ताराम यांना पदोन्नति…

पी एस आय संदीप ताराम यांना पदोन्नति…

     राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

        कुरखेडा येथे पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) संदीप तराम यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलीस विभागासह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

        कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक सेवा व उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संदीप तराम यांनी ही पदोन्नती मिळवली आहे. गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात कुरखेडा येथे कार्य करताना त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

         त्यांच्या पदोन्नतीमुळे सहकारी अधिकारी, मित्रपरिवार मध्ये आनंदाचे वातावरण असून, पुढील सेवाकार्यातही ते उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.