शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूरात नेचर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारांवर आधारित आंतरजातीय सामूहिक विवाह सोहळा शहीद बालाजी रायपूरकर सभागृह चिमूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यातून सामाजिक समता,बंधुता आणि जाति व्यवस्थेविरोधातील प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला असीम सुहास सोरदे,भाऊसाहेब रूपें,डॉ भगवान नन्नावरे,आणि भूपेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेचे संस्थापक निलेश नन्नावरे यांनी स्वतः आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला असून गेल्या पाच वर्षांपासून संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत आहे.
यावर्षी महाराष्ट्रातील सात जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पडला, तर ३० जोडप्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी संविधानिक मूल्ये समाजात रुजविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन बादल श्रीरामे यांनी तर आभार प्रदर्शन सुरज दडमल यांनी केले.



