राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक…

        राजेंद्र रामटेके

कुरखेडा तालुका ग्रामीण प्रतिनिधि

           गडचिरोली :- गडचिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक पटेल मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.

           लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १२ तालुक्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विस्तार करण्यासाठी बूथ कमिटी गठित करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील कार्यकारिणी,फ्रंटल व सेलची कार्यकारिणी, आदिवासी आघाडी, महिला आघाडी, राष्ट्रवादी युवक आघाडी, विद्यार्थी आघाडीची कार्यकारिणी तयार करणे आवश्यक असल्याचे असे मार्गदर्शन करतांना अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

            गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे मार्गदर्शन करतांना प्रदेश सरचिटणीस श्री. गंगाधर परशूरामकर यांनी सांगितले. 

        राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार व अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यावेळी वडसा तालुक्यातील व चामोर्शी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. 

           आयोजित जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जिल्हाध्यक्ष श्री. रविंद्र वासेकर, प्रदेश संघटक सचिव श्री. युनुसभाऊ शेख, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. नानाभाऊ नाकाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. लिलाधर भरडकर, रिंकूभाऊ पापडकर, योगेशभाऊ नांदगाये, फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, बाराही तालुक्याचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी व राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.