कोळसा चोरी करून नेताना चारचाकी वाहन पकडले.. — ३२ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त. 

   कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

          पारशिवनी : – पोस्टे अंतर्गत ६ किमी अंतरावर असलेल्या खदान नं ०३ डंपींग यार्ड येथून मारोती ८०० चारचाकी वाहनात कोळसा चोरून नेत असताना वेकोली सुरक्षा रक्षकानी चोरी करणाऱ्या इसमास पकडुन कन्हान पोस्टेला त्याचे विरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

          शुक्रवार (दि.१९) जानेवारीला वेकोलि सुरक्षा रक्षक देवीप्रसाद बाबुलाल देविया वय ३५ वर्ष, रा. इंदर कॉलनी खदान नं ०६ हा कामावर हजर असता दुपारी ०१.४६ वाजता दरम्यान फोन आला की,मारोती ८०० कार क्र. एम. एच. २७ डी- १२५३ मध्ये चोरीचा कोळसा मढीबाबा काली माता मंदीर पासुन घेऊन जात आहे. 

       अश्या माहीती वरून साथीदाराला फोन करून बोलावले व वेकोलि पेट्रोलींग गाडीत बसुन पेट्रोलींग अंतर्गत मारोती ८०० कार क्र. एम. एच . २७ डी – १२५३ चारचाकी वाहनाला अडवुन बघितले असता सदर वाहनात ४०० किलो कोळसा किंमती २ हजार रू. चोरून नेतांना मिळुन आल्याने १) मारोती ८०० चारचाकी वाहन किंमत ३० हजार रूपये असा अंदाजे मुद्देमाल एकूण ३२ हजार रूपयाचा मुद्देमाल आरोपी सोहेल खान यांना पकडले.

            फिर्यादी वेकोलि सुरक्षा रक्षक देवीप्रसाद देविया यांचे तक्रारी वरून पो.स्टे. कन्हान येथे आरोपी विरुध्द कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शना तपास पो.हवा. जयलाल सहारे हे करित आहे.