Home Social संपतराव जाधव व नामदेवराव जाधव यांचा दिल्लीत गौरव…

संपतराव जाधव व नामदेवराव जाधव यांचा दिल्लीत गौरव…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : पोलीस दल व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेचे राज्याध्यक्ष संपतराव जाधव यांना ‘राष्ट्रीय भारत भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच शिरूर ग्रामीणचे प्रथम लोकनियुक्त आदर्श सरपंच नामदेवराव जाधव यांना ‘राष्ट्रीय सरपंच’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

       मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटना, नवी दिल्ली या राष्ट्रीय नोंदणीकृत संस्थेच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या वेळी गौरविण्यात आले.

        केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते, तसेच मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश केदारी यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सतीश केदारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

       या सन्मानामुळे संपतराव जाधव व नामदेवराव जाधव यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली असून, त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.