Home Crime देशी दारुची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर चिमूर पोलीसांची कारवाई…  — मुद्देमाल केला...

देशी दारुची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर चिमूर पोलीसांची कारवाई…  — मुद्देमाल केला जप्त…

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी…

 चिमूर :- चिमूर पोलीसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलीस स्टेशन चिमूर हद्दीत भय्युजी शाळे समोरील रोडवर नाकाबंदी करुन एक मोटार सायकल क्रमांक एम. एच.३४-एक्यु-६८२३ ला थांबवुन मोटार सायकल वरील चुंगळीची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात एकुण १२३ नग कोकन देशी दारुच्या ९० मी.ली. प्लॉस्टीक शिश्या किंमत ६१५०/- रुपयाचा माल अवैध रित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने वाहनावरील इसम नामे (१) एकनाथ महादेव मेश्राम वय ५२ वर्ष (२) राहुल एकनाथ मेश्राम वय २३ वर्ष दोन्ही रा. अलीझंजा ता. चिमूर यांच्याविध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

       पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहे.गुन्ह्यात नमुद देशी दारु आणि दुचाकी असा एकुण ४६,हजार १५०/- रु. चा माल जप्त करण्यात आला आहे.

       सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर,ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर यांचे मार्गदर्शनात चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोहवा सचिन साठे,पोअं रोहीत तुमसरे,सचिन खामनकर,सोनु,फाल्गुन परचाके यांनी केली आहे.