बांगलादेश विजय दिवस कार्यक्रम लाखनीत साजरा…

 चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा

लाखनी :- शिवतीर्थ सैनिक फाउंडेशन,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी, मानव सेवा मंडळ व गुरुकुल औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखनी च्या संयुक्त प्रयत्नाने 1971 भारत- पाकिस्तान युद्ध व ” बांग्लादेश चा उदय ह्या घडामोडीत..

         भारतीय सेनेच्या अद्भुत पूर्व विजयाचे औचित्य साधून ” विजय दिवस ” गुरुकुल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भव्य समारोह हाल ” मध्ये साजरा करण्यात आला. 

       ह्या कार्यक्रमास वीर योद्धा, वीरपत्नी ,बहुसंख्य आजी, माजी सैनिक, ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी व मानव सेवा संस्थेचे पदाधिकारी व गुरुकुल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. 

         छत्रपति शिवाजी महाराज व भारत मातेच्या फोटोला हार घालून व मानवंदना देऊन कार्यक्रमाला शुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला युद्धात प्राणाची आहुती देणार्‍या वीर योद्द्यांसाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली…

           मान्यवर माजी योंद्धयांचे व वीर पत्नीचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले.आदरणीय पाहुण्यांचे सौ. जयश्री मेश्राम सहप्राचार्या व त्यांच्या विद्यार्थिनींनी सुन्दर स्वागत गीताने अभिनंदन केले.

           कार्यक्रमाचे अध्यक्ष मानव सेवा संस्थेचे श्री. शफी लद्धानी,वरिष्ठ एडवोकेट यांनी अध्यक्षीय भाषणात माजी सैनिकांचे अभिनंदन करून ‘ विजय दिवस ‘ साजरा करण्याचे मह्त्व काय हे सांगितले.

            प्रास्ताविक सूभेदार मेजर ( ओनरेरी कैप्टन) रविन्द्र गायधनी यांनी युद्ध कसे लादले गेले, युद्धातील घडामोडी व बांग्लादेश स्वतंत्र करण्यात भारतीय सेनेचा विजय कसा झाला यावर भर दिला..

         सूत्र संचालन सूभे. मेजर ऋषी वंजारी तर आभार प्रदर्शन सूभेदार ( ऑनरेरी कैप्टन ) चंद्रमुनि वैद्य यांनी पार पाडले. 

            वरील कार्यक्रमा करीता साकोली वरुन माज़ी वीर योद्धे यशवंतराव बोरकर, शंकरराव भुते, मनोहर चौधरी, दुलीराम फूलबांधे तर लाखनी येथुन सूभेदार रामाजी गंधे व वीरपत्नी ऊर्मिला गणपत तितीरमारे उपस्थित होत्या. 

           माज़ी वीर योद्ध्यांनी उपस्थित सर्वांना आपले युद्धातील योगदान व कर्तव्याची जाणीव करून दिली व आपले अनुभव सांगितले.  कार्यक्रमा नंतर सर्व पाहुणे व विद्यार्थी यांच्या करीता फराळाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. 

            वरील आयोजित कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पार पाडण्यास गुरुकुल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. खुशालचंदजी मेशराम,रमेश गभने,भैय्यालाल बावनकुळे,पुरुषोत्तम मटाले ,विद्यमान जाधव ,डॉ. दिलीप अंबादे,ग्रीनफ्रेंड्सचे मंगल खांडेकर,मारोतराव कावळे,अशोक नंदेश्वर,दिलीप निर्वाण,अशोक धरमसारे तसेच आयटीआय विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

             भारत मातेचा जयघोष करून कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.