इंदापूर महाविद्यालय वाचन प्रेरणा दिन व मेरी माटी मेरा देश उपक्रमाचे आयोजन…

निरा नरसिंहपुर दिनांक:19

प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार

   इंदापूर महाविद्यालयातील ज्युनिअर विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि.16 ऑक्टोंबर रोजी महाविद्यालयातील शाहीर अमर शेख सभागृहामध्ये देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील मेरी माटी मेरा देश उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

   यावेळी डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्राथमिक स्वरूपात व्यासपीठावर काही विद्यार्थ्यांनी वाचन केल्यानंतर सामूहिक वाचन करण्यात आले.

    मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आणलेली माती एकत्रितरित्या माठामध्ये संकलित करण्यात आली.

      उपप्राचार्य प्रा. दत्तात्रेय गोळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात मुलांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत आपल्या जीवनात मातीचे महत्त्व आणि तिचे सृजनशीलता याविषयीचे महत्त्व सांगितले.

   प्राध्यापिका कल्पना भोसले , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अमित दुबे यांनी मनोगत व्यक्त केले.कु. ज्ञानेश्वरी मखरे, कु. प्राची जाधव, कु.अमृता कवडे यांनी वाचन केले.

     राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका सुवर्णा जाधव यांनी प्रास्ताविक केले.  

     यावेळी प्रा.भारत शेंडे ,प्रा रविंद्र साबळे उपस्थित होते. 

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनंजय माने आणि प्रा.अमोल मगर यांनी केले. 

   आभार प्रा. संतोष पानसरे यांनी मानले.