दोन-तिन घराचा आमदार नकोय,चिमूर विधानसभा क्षेत्रात ओबीसी संवर्गातील आमदार करण्यासाठी तयार व्हा…:- ना.विजय वडेट्टीवार… — नालायक गुरुजी पोलीस संरक्षात फिरतो आहे. — गुंडगिरीची भाषा खपवून घेणार नाही,मस्ती व दादागिरी जिरवून टाकू.. — नऊ वर्ष झाले मोखाबर्डी कालवान्वये इंदिरा सागरचे पाणी मिळालेच नाही… — मुरुमाचे अवैध उत्खननं व करोडो रूपयांची रॉयल्टी चोरी.. — दारू?  — जनसंवाद समारोपीय कार्यक्रम….बिरजे पाटील मैदान चिमूर…..

 

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

           बहुजनांच्या मतदार संघात बहुजनांच्या मतावर आमदार होऊन त्यांच्या हितासाठी न लढणाऱ्या दोन-तीन घरच्या व्यक्तीला यापुढे आमदार होऊ देणार नाही.पुढील विधानसभा निवडणूक अंतर्गत चिमूर विधानसभा मतदार संघात केवळ ओबीसी संवर्गातील आमदार असेल व ओबीसी संवर्गातील आमदार बनविने तुमचे आणि माझे काम आहे,असे सुचक व दमखम वक्तव्य करुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी चिमूर विधानसभा मतदार संघातील उपस्थित महिला भगिनींत,पुरुष बांधवात,तरुण युवकांत-युवतीत नवीन आशेचा किरण निर्माण केलाय व बहुजन समाजातील तमाम नागरिकांना त्यांच्या अस्तित्वासाठी सतर्क केले.

            राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रा समारोपीय कार्यक्रम प्रसंगी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ‌.सतिश वारजूकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार,माजी आमदार व माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष,राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ.अविनाश वारजूकर,विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी,आदिवासी सेल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नामदेवराव उसेंडी,व इतर मान्यवर सभा मंचावर उपस्थित होते.

          ना.विजयभाऊ वडेट्टीवार म्हटले की राजकीय क्षेत्रातील युध्दांचे गामीणी भुमिका अन्वये विजयी संग्राम आणि संग्राम जिंकने हा त्यांचा राजकीय हथकंडा..

 

            चिमूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक कार्यकर्ता त्यांना चिरपरिचित आहे व ते त्यांच्या जवळ आहेत.यामुळे ते चिमूर विधानसभा मतदार संघातील विजय आपल्याकडे खेचून आणु शकतात एवढे पक्के आहे.

**

आता ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे वेगवेगळे मुद्दे व मनोगत…

१) नालायक गुरुजी..

          आंबे खाल्याने पोर होते म्हणणारा व आमचे प्रेरणास्थान असलेल्या महापुरुषांचा सातत्याने अपमान करणारा संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हा नालायक गुरुजी आहे व हा नालायक गुरुजी पोलीस संरक्षात फिरतो आहे.

             या नालायक गुरुजींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी,छत्रपती शिवाजी महाराज,सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व युगपुरुष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद बोलून समाजासमात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे व महाराष्ट्रातील जनतेत एकमेकांप्रती द्वेष भावना व्हाव्यात अशा पध्दतीचे गंभीर काम केले आहे.

            असे असताना हा नालायक गुरुजी पोलीसांच्या संरक्षणात फिरतो आहे.आमचे सरकार आले तर याला कारागृहात डांबल्याशिवाय राहणार नाही असे कायदेशीर व सामाजिक सलोख्याचे महत्वपूर्ण वक्तव्य ना.विजभाऊ वडेट्टीवार यांनी केले.

***

२) गुंडगिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही व जसासतसे उत्तर देणार…”बहुजन समाजासाठी काय केले?

             बहुजन समाजाचा चिमूर विधानसभा मतदार संघ असताना त्यांच्याच मताच्या बलावर दोनतीन घरचा आमदार बनतो व गुंडगिरीची भाषा करतो आहे हे बरोबर नाही.तद्वतच बहुजन समाजाच्या हितासाठी काहीच बोलत नाही व त्यांच्या हितासाठी कार्य करीत नाही.

          मात्र त्यांच्या मतावर आमदार बनून गुंडगिरीची भाषा करतोय हे खपवुन घेतले जाणार नाही.यावेळी त्याची जागा त्याला दाखवून देऊ व चिमूर विधानसभा मतदार संघात ओबीसी संवर्गातील आमदार बनवू असे दमखमपणे ते जनसंवाद समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलले.

           याचबरोबर पुढे माफीनामा या वक्तव्याला अनुसरून बोलताना ते आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्यावर ताशेरे ओढत म्हणाले की चिमूरचे लोक तुला हद्दपार करतीलच पण गुंडगिरीची भाषा बोलणाऱ्यांची मस्ती व दादागिरी जिरवून टाकू,गुंडगिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही..”पटल तर ठीक नाही तर रामटेक,होवून जाऊ द्या,” दुध का दुध,पाणी का पाणी…परत आव्हानात्मक बोलतांना म्हणाले की एका औलादीचा अससील तर माफीनामा आणून दाखव..आम्ही माफी विर नाही आणि माफी मागणार नाही…

           येणाऱ्या विधानसभा निवडणूक काळात गुंडगिरी करणाऱ्यांना पळवू पळवू मारु असे वक्तव्य करतानाच आम्ही काय गांडुची औलाद आहोत काय?असा प्रतिप्रश्न केला..

***

३) मोखाबर्डी कालवान्वये पाणी मिळालेच नाही…

            चिमूर विधानसभा मतदार संघाचा किर्तीकुमार भांगडिया आमदार झाल्याला ९ वर्ष झालीत पण चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना इंदिरा सागरचे मोखाबर्डी कालवान्वये उप कालव्याद्वारे अजून पर्यंत पाणी मिळालेच नाही.

           अर्थात हा आमदार शेतकऱ्यांप्रती दक्ष नसल्याचे ते बोलून गेले.

***

४) मंगळसूत्र व रस्ता चोर व मुरुम चोर…

          रक्षाबंधन कार्यक्रमाला अनुसरून बहिणींना मंगळसूत्र देणाऱ्या आमदार बंटी भांगडियाची नियत साफ आहे काय?यावर विचार करण्याची वेळ आली आहे.मुलींना,विधवांना,म्हाताऱ्यांना,महिलांना मंगळसूत्र देणारा आमदार?आणि अशा आमदाराला काय म्हणावे? मंगळसूत्र देणाऱ्या आमदाराला आपल्या दारात येवु न देण्याचे जोरदार आव्हान त्यांनी उपस्थित महिला भगिनींना केले. 

            हा आमदार मुरुम चोर व रस्ता चोर असून मुरुम चोरी संबंधाने अंदाजे २०० कोटी रुपयांच्या घरात त्यांच्या संबधितावर रॉयल्टी निघू शकते असा गंभीर आरोप जनसंवाद समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केला.

***

५) दारू…

       चिमूर क्रांती भुमीत नवीन दारुंची दुकाने लावण्यासाठी एनओसी कुणी दिली?हे चित्राताई वाघ यांनी आमदार भांगडिया यांना विचारायला पाहिजे होते व दारू बंदी काळात त्यांच्याच व्यक्तींची दारू विक्री सुरु होती याची माहिती चित्राताई वाघ यांना द्यायला पाहिजे होती‌. 

      जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता आम्ही दारुबंदी उठवली व गरीब लोकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळले यात काय गैर आहे असेही ते बोलून गेले.

***

             चिमूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी अनेक विषयावर भाष्य करताना उपस्थितांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले व महाराष्ट्र राज्यकर्त्यांच्या अनागोंदी कारभाराचे वाभाडे चव्हाट्यावर आणले.

           याचबरोबर चिमूर विधानसभा मतदार संघाचे स्थानिक आमदार बंटी भांगडिया यांच्यावर चौफेर हल्ला करीत त्यांच्या अयोग्य कारभाराच्या वारंवार दांड्या उडवल्या…

        ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी चिमूर विधानसभा मतदार संघातील बंधू भगिनींना दिलेले सहकार्य व त्यांनी गोरगरीबांची निकाली काढलेली कामे स्मरणार्थ आहेत हे विसरून चालणार नाही.