कत्तलीसाठी अवैद्यरित्या जनावरांची वाहतुक करणारे दोन पिकअप वाहन पकडले. — तीन आरोपी कडून १४ लाख १९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त. 

 

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 

पारशिवनी : – पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर ग्रामिणच्या स्पेशल पोलीस पथकाने तारसा रोड कन्हान ते नागपुरकडे कत्तलीसाठी जनावरांची अवैद्यरित्या वाहतूक करीत असताना सिहोरा शिवार येथे दोन पिकअप थांबवुन चौकशी नंतर जप्त केले.

             पिकअप वाहनात कोंडलेल्या अवस्थेत व एकमेकाना बांधून ४३ जनावरे (गाई-बैल) होती.

           यामुळे दोन वाहन चालकासह आरोपींना अटक केली व त्यांचे ताब्यातील दोन पिकअप वाहनातंर्गत ४३ गाय,बैल,कालवड,गोरे असा १४ लाख १९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

            मंगलवार (दि.१९) सप्टेंबरला पाहाटेच्या दरम्यान नागपुर ग्रामिणच्या विशेष पोलीस पथकातील पोलिस उपनिरिक्षक अमित पांडे सह,पो.ना. वैभव बोरपल्ले,पो.ना.निखिल मिश्रा,पो.शि.पुरशोतम कावड़े,पो. हवा.नारायण भोयर हे पोलीस स्टेशन कन्हान परिसरात रात्रकालीन गस्त करीत असताना त्यांना खात्रीशीर माहीती मिळाली की,तारसा रोड कन्हान ते नागपुर रोड येथे सिहोरा शिवारात कडे दोन पिकअप मध्ये काही इसम अवैधरित्या कत्तलिकरिता गाई बैल  घेवुन जात आहे.

         अशा खात्रीलायक माहिती वरून पंच व स्टाफसह कन्हान पोलीस स्टेशनच्या हदीत सिहोरा शिवारवर नाकाबंदी करून दोन पिकअपला थांबवुन चालक १) मो.तालीव मो.खान २) जुबेरखान हाफिज खान (३) जिया कुरेशी (४) आरोपी फरार यांना ताब्यात घेऊन पिकअप ची झडती घेतली असता योध्दा पिकअप क्र.एमएच – २५ पि -५८२५ चे मागिल डाल्यात ५ गोरे,४ कारवळ,७ गाय व ६ बैल असे २० जनावरे  व योध्दा पिकअप क्र. एमएच- ४९ – ए.टी. – ८६८१ चे मागिल डाल्यात १२ बैल ८ गाय व ३ कालवड  असे एकुण २३ जणावर दिसून आलीत. 

           दोन्ही पिकअप वाहन मध्ये एकुण १८ बैल किमत २ लाख १६ हजार,१५ गाय किंमत १ लाख ५० हजार ,७ कालवड किंमत ३५ हजार आणी ३ गोरे किंमत १८ हजार रूपये असल्याचे पुढे आले.

      एकुण ४३ पशुंची किमत ४ लाख १९ हजार आहे.पशुंना  कुरतेने कोंबुन,एकमेकांना बांधुन त्यांचे खान्यापिण्याची कोणतीही व्यवस्था न करता पिकअप द्वारा वाहतूक करणे सुरु होते.

           योध्दा पिकअप वाहनाचा परवाना नसल्याचे सांगितल्याने व सदर जनावर (४३) पशु  निर्दयतेने कत्तलीकरिता घेवुन जात असल्याचे निष्पन्न झाल्याने पंचासमक्ष तिन्ही आरोपी मो. तालीव मो.खान २) जुबेरखान हाफिज खान (३) जिया कुरेशी (४) आरोपी फरार यांना  व पिकअप एमएच- ३३ – जी – २३७४ किमंत ५ लाख रुपये प्रमाणे दोनवाहन किमत १० लाख रुपये,असा एकुण १४ लाख १९ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

            कन्हान पोस्टेला सरकार तर्फे फिर्यादी पो.हवालदार नारायण भोजराज ठाकरे यांचे तक्रारीनुसार आरोपी (१) मो तालीव मो खान(२). जुबेर खान हाफिज खान(३) जिया कुरेशी (४) फरार आरोपी यांचे विरूध्द अपराध क्रमांक ६१०/२३ कलम ११(१) अ,ड,फ,ई,एफ,आई प्रमाणे प्राण्यांना क्रुरतेने वागविण्याच्या कायदा १९६० सहकलम ५ ( अ),महा प्राणी सुरक्षा अधि.१९९५ सहकलम ११९.१०९  ३४ भादंवि अन्वये कारवाई करून सदर ४३ पशु यांची पोस्टेला कन्हान येथे चारापाण्याची तसेच ठेवण्याची व्यवस्था नसल्याने ही जनावरे देवलापार येथिल गौशाळेत सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वाधिन करण्यात आले.

           दोन्ही योध्दा पिकअप पोस्टे कन्हान पोस्टे येथे ठेवण्यात आले आहे.पुढील तपास पो.नि. सार्थक नेहते करीत आहेत.