पालोरा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली २० वर्षे पुराण्या हिरव्या गर्द झाडाची अमानुषपणे कत्तल… — ठराव फांद्या तोडण्याचा,तोडले झाडे… — सरपंच व ग्रामसेवक अज्ञभिंत… — ग्रामस्तानी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात केली तक्रार…

कमलसिंह यादव 

   प्रतिनिधी

पारशिवनी :-तालुक्यातील पालोरा ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या मंदिर परीसरातील व ग्रामपंचायत आरोग्य केन्द्र हद्दीतील अनेक झाडांची विनापरवानगी कत्तल करण्यात आली. याला कारणीभूत कोण असा प्रश्न सध्या पालोरा ग्रामस्थ विचारत आहे. 

      पालोरा येथील महंत बाबा मंदिर व हजरत खाकसावली चांदशाहवली दर्गा परीसरातील तसेच ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सागवन आवला, करंजी, पिपल तसेच आडजात झाडांची कत्तल करण्यात आली. एकीकडे राज्य शासन झाडे लावा , झाडे जगवा या श्लोगनाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करून त्याचे संवर्धन करीत आहे. तर दुसरीकडे पालोरा ग्रामपंचायत चे पदाधिकारी झाडांची कत्तल करीत आहे. यामुळे पालोरा ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागा चे रेजर आफिसर ला विचारणा केली असता , या झाडांचा वृक्षतोडीबाबत आम्हाला कसल्याही प्रकारचे पत्रव्यवहार ग्रामपंचायतने केले नसल्याचे सांगीतले. व या घटना ची माहिती गोळा करून सर्वेयर च्या माध्यामाने तपास करून जर कोणी दोषी असेल तर योग्य कार्यवाही केली जाणार अशी माहीती वन विभाग तालुका आफिस यांनी दिली . तसेच ग्राम पंचायत पालोरा चे ग्राम सेवक यांना विचारले असता त्यानी सांगीतले की झाड ची कतल करण्या साठी भासिक सभेत ठराव घेतला होता पण वासविकता आशी आहे की ठराव फा दे तोडण्यासाठी घेतले होते पण पंचायत चे अधिकारी सरपंच उपसरपंच यांनी झाड ची कतल करून घेतली पण वास्तवीकता पालोरा गाव हे पारशिवनी – रामटेक या राज्य महामार्गावर आहे. याच रस्त्याने अधिकारी व कर्मचारी ये – जा करीत असतात. त्यांचेही या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. 

पर्यावरणाचा पायमल्लीचे काय ?

एक झाड तोडले तर त्याऐवजी झाडे लावण्याचा वन मंत्रालयाचा आदेश आहे. मात्र या आदेशाला धाब्यावर ठेवत झाडांची कत्तल तर केलीच पण एक साधे झाडही लावण्यात आलेले नाही. हे विशेष ! वनविभाग साधारणतः वृक्षसंवर्धनाचा हिशोबाने काम करीत असते पण पालोरा हे गाव हाकेच्या अंतरावर असताना वनविभागाला याबाबत माहिती का देण्यात आली नाही. व वन रक्षक च्या क्षेत्रात काम आहे त्याना कसे माहीत झाले नाही ते मौन का हा ग्राम वासी विचारत आहे.

सरपंच पुष्पाताई गोरले यांचे मत 

ग्रामपंचायत सरपंच क्षीमती. पुप्पाताई माणिकराव गोरले यांनी सांगितले की ग्रामपंचायत च्या सभेत सदर स्थळावरील झाडाच्या फांद्या तोडण्याचा ठराव घेण्यात आला होता. 

पण फांद्या ऐवजी अख्खे. झाडेच तोडण्यात आले. या बाबद मला कोणी ही कल्पना दिली नाही. 

झाडे तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सरपंच. पुप्पाताई गोरले यांनी सांगितले. 

ग्रामपंचायत पालोरा ग्रामसचिव विणायक गहाणे 

पालोरा ग्रामपंचायतचे ग्रामसचिव विणायक गहाणे 

ग्रामपंचायत पालोरा येथील सचिव विनायक गहाणे यांनी सांगितले की. ग्रामपंचायत व मंदिर परिसरात असलेल्या झाडाच्या फांद्या धोका दायक स्तिस्तीत असल्याने जवळच्या इमारती ला धोका दायक असल्याने फांद्या छाटणी करण्याचा ठराव घेण्यात आला होता. 

पण प्रत्येक्ष पाहणी केली असता. फांद्या छाटणी ऐवजी झाडेच तोडण्यात आली ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. 

ग्रामपंचायतने फांद्या छाटण्यांचा ठराव घेतला. झाडे तोडण्याचा नाही. त्यामुळे आम्ही वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला परवानगी करीता अर्ज दाखल केला नाही. पण आता नव विभागाला कळविले जाणार असल्याचे सचिव विनायक गहाणे यांनी स्पष्ट केले. 

झाडे छाटण्यां एवजी. तोडली कोणी? 

ग्रामपंचायत व पुरातत्तव मदिर परिसरातील १५ ते २० वर्षे जुनी डेरेदार झाडे ही मंदिर व आरोग्य केन्द्र ग्रामपंचायतीच्या वैभवात भर टाकणारे होते. पण ग्रामपंचायत ने घेतलेल्या ठरावाचा अभ्यास न करता झाडे छाटण्यां एवजी. तोडण्यात आली.

ग्रामपंचायत उपसरपंच कृणाल कामडे यांना विचारणा केली असता म्हणाले की झाडापासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून झाडाची छाटणी केली आहे. तोडली नाही असे सांगितले. 

पण प्रत्यक्षात पाहणी केली असता झाडे तोडण्यात आली आहे. 

वन परिक्षेत्र अधिकारी शालिनी शाहपुरकर वन विभाग पारशिवनी 

ग्रामपंचायत व मंदिर परिसरात असलेल्या झाडाच्या मालकी हक्का बाबत व सदर झाडे वन परिक्षेत्र किंवा गावठाण किंवा जुंडपी किंव्वा कोणत्या क्षेत्रात येतात या बाबद चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

ग्रामपंचायत व मंदिर परिसरातील झाडे जर ग्रामपंचायत ची संपत्ती किंवा मालकी हक्काचे असेल तरी झाडे तोडणे करिता नियमानुसार वनविभागाची पुर्व परवानगी शिवाय तोडता येत नाही. 

आम्हाला मिळालेल्या तक्रारी वरून सवेयर च्या माध्यामाने तोडलेल्या झाडाचा पंचनामा करून झाडाची लाकडे जप्त करण्यात येणार. 

व चौकशी करून दोषी वर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी शालिनी शाहपुरकर पारशिवनी यांनी सांगितले. 

पोटच्या पोराप्रमाणे संगोपन केलेल्या झाडांची कत्तल करणाऱ्या वर कारवाई करा. 

पालोरा गावातील माजी सरपंच व जेष्ठ नागरिकांनी या वृक्ष तोडीवर आक्षेप घेतला असून. ज्या झाडांना आम्ही पोटच्या पोराप्रमाणे लहानाचे मोठे करून संगोपन केले त्या झाडाची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. 

हे अमानवी कृत्य करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांला तात्काळ पदमुक्त करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.