आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार लाभार्थीने कर्ज योजनेचा लाभ घ्यावा.

डॉ. जगदिश वेन्नम
  संपादक
गडचिरोली,(जिमाका)दि.19: सन 2023-24 करीता कर्ज वाटपाचा लक्षांक प्राप्त झालेला असुन महिला सबलीकरण योजना (02 लक्ष) लाभार्थी संख्या 08, बचत गट योजना (05 लक्ष) लाभार्थी संख्या 01, कृषी आणि संलग्न व्यवसाय (02 लक्ष) लाभार्थी संख्या 10, हॉटेल ढाबा व्यवसाय (05 लक्ष) लाभार्थी संख्या 02, स्पेअर पार्ट्स/गॅरेज/ॲटो वर्कशाप (05 लक्ष) लाभार्थी संख्या 02, वाहन व्यवसाय (10 लक्ष) लाभार्थी संख्या 01, लघु उद्योग व्यवसाय (03 लक्ष) लाभार्थी संख्या 01, असे एकूण लाभार्थी संख्या 25 असुन आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार लाभार्थीने कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शाखा व्यवस्थापक, गडचिरोली यांनी केलेले आहे. इतर संपूर्ण माहिती करीता शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा कार्यालय, गडचिरोली (विधाता भवन पहिला माळा चामोर्शी रोड) येथे संपर्क साधावे असे शाखा व्यवस्थापक शबरी आदि.वित्त व विकास महा.मर्या. गडचिरोली यांनी कळविले आहे.