कापसाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत… — पांढऱ्या सोन्याचा भाव कवडीमोल… — केंद्रसरकार व राज्यसरकार यांचे कडून शेतकऱ्यांची पिळवणूक… — युवक काँग्रेसतर्फे आक्रोश आंदोलन होणार..

 

दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका 

      भाजप सरकार कडून फक्त मतदानासाठी शेतकऱ्यांना मोठी व खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा खळबळजनक आरोप चिमूर विधानसभा उपाध्यक्ष व युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत डवले यांनी केला आहे.

       कापसाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून त्यांच्या आर्थिक व इतर समस्यात वाढ झाली आहे.तद्वतच कापसाला कवडीमोल भाव देऊन केंद्र सरकार व राज्य सरकार काय साध्य करतय हेच कळायला मार्ग नाही.

     मात्र,कापसाला योग्य भाव न देता कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व इतर शेतकऱ्यांची केंद्र सरकार व राज्य सरकार पिडवनूक करत असल्याचे सुद्धा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत डवले यांचे म्हणणे आहे. 

      कापसाला हमीभाव न दिल्यास केंद्रशासन तसेच राज्यशासन यांचे विरोधात युवक काँग्रेस चिमुरच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर आक्रोशात्मक आंदोलन घेतले जाईल असे सुतोवाच तालुकाध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर यांनी सोडले आहे.

        युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत डवले हे निर्भिड व निर्भय कार्यकर्ता असून कर्तव्यातंर्गत दक्ष आहेत.