दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे मागील सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नाही.यामुळे त्यांना दैनंदिन व्यवहार करणे मुश्किल झाले आहे.
याचबरोबर कुटुंबियांच्या व स्वतःच्या जीवनावश्यक मुलभूत गरजा वेळेवर भागविणे कठीण झाले आहे.विना रुपयांनी जगायचे कसे? व रुपये नसल्यामुळे दळणवळणाच्या व्यवस्थे अभावी घरकुलांसंबंधाचे कामे निकाली काढायचे कसे?हा गंभीर प्रश्न त्यांच्या पुढे उदभवला आहे.
यामुळे सहा महिन्यांपासून थकीत असलेले मानधन मिळावे यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी १५ में पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हे कामावर रुजू होणार नाही तोपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना,सब्बरी आवास योजना,रमाई आवास योजना अंतर्गत घरकुलांची कामे पुर्ववत सुरू होणार नाही आणि नवीन घरकुल याद्यांना प्राधान्य क्रमाने मंजुरी मिळविता येणार नाही असे एकंदरीत चित्र आहे.
गटविकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांच्यासह,चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या आर्थिक गरजाकडे जातीने लक्ष देत त्यांचे सहा महिन्यांपासून थकीत असलेले मानधन तात्काळ द्यावे असी त्यांना लेखी पत्रव्यवहारा द्वारे विनंती केली आहे.
मात्र,संबंधित सीईओ चंद्रपूर,प्रकल्प संचालक चंद्रपूर, गटविकास अधिकारी प.स.चिमूर,यांनी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या रास्त पत्रव्यवहाराला अजून पर्यंत महत्त्व दिले नाही आणि त्यांचे मानधन देण्याच्या संबंधाने गांभीर्याने विचार केला नसल्याचे दिसून येते आहे.
यामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे मानधन न देता गोरगरिबांच्या घरकुलांचे कामे जाणिवपूर्वक रोखली जात आहेत काय? आणि गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रशासकीय यंत्रणेचा घाट आहे काय? हा प्रश्न उद्भवतो आहे.