माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबीतांची  निवृत्ती वेतन समस्या सोडविण्याविषयी….

 

सतिश कडार्ला

 प्रतिनिधी

गडचिरोली,(जिमाका)दि.19: गडचिरोली जिल्हयातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व पेन्शनधारक अवलंबित यांच्या निवृत्ती वेतन विषयी समस्यांचे निवारण, SPARSH, PCDA संबंधी अडीअडचणींची समस्या सोडविण्या करीता 24/04/2023 व 25/04/2023 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सकाळी 10.00 वाजता डिपीडीओ सिकंदराबाद येथील विशेष टिम येत आहे. तरी जास्तीत जास्त माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा पत्नी व अवलंबित पेन्शनर यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन कॅप्टन दिपक र. लिमसे (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण कक्ष अधिकारी, गडचिरोली करीत आहेत. अधिक माहिती करीता दुरध्वनी क्रमांक 07172-257698 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.