देसाईगंजच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी इव्हिएम जाळली!… — इव्हिएम हटाओ,देश बचाओ च्या जयघोषात केला इव्हिएमचा विरोध…

 

पंकज चहांदे

दखल न्यूज भारत

 

देसाईगंज –

     देशाच्या इतिहासात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासुन १९ लाख इव्हिएम मशिन गायब असुनही याबाबत इलेक्शन कमिशन गंभीर असल्याचे दिसून येत नाही. यावरून इव्हिएमच्या आधारे फार मोठे षडयंत्र रचले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता इव्हिएम हटाओ, देश बचाओ च्या जयघोषात इव्हिएमचा जाहिर विरोध करून देसाईगंजच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी इव्हिएम मशिनची प्रतिकृती जाळुन येणाऱ्या प्रत्येक निवडणुका बॅलेट पेपरने घेण्याची मागणी केली.

      देशाच्या इतिहासात २०१९ च्या लोकसभा निवडणुकी पासुन १९ लाख इव्हिएम मशिन गायब असल्याचे सुतोवाच करण्यात येत असतानाच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकुण १७.४ लाख व्हिव्हीपॅट मशिन उपयोगात आणली गेली होती. पैकी ६.५ लाख अर्थात जवळजवळ ३७ टक्के मशिनी खराब असल्याचे निष्पन्न झाले होते.

     गुजरात विधानसभेच्या पार पडलेल्या निवडणुकीत एका बुथवर केवळ ९० मतदान असताना २७० मतदान केले गेल्याचे तसेच एका संपुर्ण गावाने बीजेपीला एकही मतदान केले नसताना तब्बल २ हजार २०० मते बीजेपीलाच केल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले होते. याबाबत संबंधित मतदारांनी इलेक्शन कमिशनकडे तक्रार करून अद्यापही दखल घेण्यात आली नसल्याने व वारंवार बीजेपीच्या कार्यकर्त्यांकडे इव्हिएम मशिन सापडत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल करण्यात येत असल्याने इव्हिएमच्या माध्यमातून देशाच्या नागरिकांना मुर्ख बनविण्याचे काम सुरु असल्याचे नाकारता येत नाही.

    विशेष म्हणजे देशाच्या सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इव्हिएम हटाओ ची मागणी लावून धरली असताना सत्ताधारी माञ इव्हिएम बाबत बोलायलाही तयार नाहीत. इव्हिएम मशिनची विश्वासार्हता नसल्यानेच जगातील इव्हिएम मशिन उत्पादित देशांनी इव्हिएम मशिनचा वापर बंद करून बॅलेट पेपरने निवडणुका घेत आहेत. तर नुकतेच बांग्लादेशाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी इव्हिएम हटाओ ची मागणी लावून धरली असता तेथिल सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाची मागणी मान्य करत बॅलेट पेपरने निवडणुका घेण्याचे जाहिर केले आहे. असे असताना भारतात माञ फक्त सत्ताधारीच इव्हिएमच्या बाजुने असल्याचे दिसून येत असुन इव्हिएमच्या भरोशावरच आणखी देश बरबाद होऊ द्यायचा नाही, यास्तव इव्हिएम हटवून बॅलेट पेपरनेच निवडणुका घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट करत देसाईगंजच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी इव्हिएम मशिनची प्रतिकृती जाळुन इव्हिएम हटाओ चा नारा बुलंद करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुका बॅलेट पेपर ने घेण्याची मागणी केली.

      इव्हिएम हटाओ देश बचाव चे आंदोलन पवन गेडाम यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी पिंकू बावणे, प्रदीप लाडे, प्रवीण राऊत, दीपक मेश्राम, मंगलबाई रामटेके, चिराग बनकर, मनोज सुखदेवे, चक्रधर पारधी, खुशाल घुटके, सुनिता राऊत, शालूताई बनसोड, सुरबा नाकतोडे, मीनाताई प्रधान, लताताई मेश्राम आदी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.