खासदार फ्रॉड, प्रधानमंत्री महाफ्रॉड!..

       लोकशाही, निवडणूक, खासदार,प्रधानमंत्री,मंत्री आणि देशाचा कारभार हे सांगताना,लिहिताना,शिकवताना खूप आभिमानाचे वाटते.पण ते तितके सत्य नाही.हे सत्य कोणीही खासदाराने किंवा प्रधानमंत्रीने जनतेला जाहीर सांगितले नाही.विचारले तरीही कबूल करीत नाही.आणि आम्ही लोकशाहीचे गोडवे गातो.म्हणे भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही?नाही! ही तर सर्वात मोठी फ्रॉडशाही!आमचा खासदार फ्रॉड,आमचा प्रधानमंत्री फ्रॉड.ते कसे?

        आता लोकसभा निवडणूक लागली.प्रत्येक पक्ष एक्स रे लावून उमेदवार शोधत आहेत.कसा?त्या उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता पाहिजे.येथे क्षमता म्हणजे नेमके काय हो?क्षमता म्हणजे किमान दहा कोटी खर्च करण्याची श्रीमंती.आधी दहा कोटी आमच्या पक्ष नेत्याकडे जमा करा.मग आम्ही तुम्हाला उमेदवारी चा ए आणि ए बी फार्म देऊ.ज्यावर पक्ष नेत्यांची सही राहिल.आम्ही या माणसाचे दहा कोटी जमा करून घेतले.म्हणून या माणसाला आम्ही आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर करीत आहोत.या माणसाला आमच्या पक्षाचे चिन्ह कमळ/पंजा/घड्याळ/ धनुष्यबाण देत आहोत. निवडणुक अधिकारी ने या माणसाला आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मतपत्रिकेत समावेश करावा.

    उमेदवार कसला ?अधिकृत चोर तो!

     असे पत्र देणारा आणि घेणारा येथून फ्रॉड सुरू करतो.तोच माणूस सभेत, टिव्ही वर येऊन सांगतो,कि मी आणि माझा उमेदवार प्रामाणिक आहे.आमच्यावर विश्वास ठेवा.आम्ही तुमचे आणि देशाचे कल्याण करायला निघालो आहोत.असे मोदी गांधी पवार ठाकरे रोज सांगत आहेत.पण यांच्या मनात काय पाप साचलेले आहे,पुढे कशी लुटमार करायची आहे,हे सांगत नाहीत.तर मग, आम्ही मतदारांना तरी ते कळले पाहिजे.मला तरी कळले कि,कष्टाचे दहा कोटी खर्च करून हा खासदार बनून कोणती जनसेवा आणि देशसेवा करणार आहे?

        मोदी गांधी पवार ठाकरे यांना माहिती आहे कि, संविधान हे कोणत्याही भारतीय नागरिकाला मताचा आणि उमेदवारीचा अधिकार देत आहे.पण कोणी सज्जन माणूस या चोरांच्या स्पर्धेत कसा टिकेल?शेती करून,किराणा चालवून, भाजीपाला विकून , ट्युशन घेऊन,कोणी टेलर,रिक्षावाला दहा कोटी कसा कमवेल?कसा खर्च करेल?कसा खासदार होईल?शक्य आहे काय? तर मग,या लोकांचा आणि लोकशाही चा काय संबंध?या लोकांचा आणि लोकसभेचा काय संबंध?जे अनेक पिढ्या शक्य नाही.तरीही आम्ही अंगावर गुलाल टाकून नाचतो.चोरांच्या विजयात मुर्ख दिवाना!

   हे कोणाला शक्य आहे?दारू विकणारा,रेती माफिया ,बांधकाम ठेका घेणारा, सट्टा पेढी चालवणारा, डान्स बार चालवणारा,चोरुन गाडी मोटर विकणारा,प्राॅपर्टी डिलर.असे धंदे करणारा माणूस लोकसभेत जाऊन काय भले करणार?या धंद्यात प्राॅफीट मिळवण्यासाठी काय काय पाप करावे लागते?जावे त्याच्या वंशात,तेंव्हाच कळे.पण त्या व्यवसायात जाऊन कळले तर ते बाहेर सांगण्याचे नैतिक बळ त्यांच्यात उरत नाही पुर्ण चादर,शाल,गोदळी मैली झालेली असते.त्याला या पापाची,घाणीची,गटारीची दुर्गंधी जाणवतच नाही.आगे ग्राहक,पिछे ग्राहक,दाए ग्राहक,बाए ग्राहक तो शरम किस बातकी?

      दहा कोटी खर्च करणारा माणूस जर खासदार निवडून दिला तर मला नाही वाटत कि तो जनतेची,देशाची सेवा करू शकतो.तो पन्नास कोटी जनतेच्या ताटातून चोरणारच! मुंबई ते गोवाहटी व्हाया सुरत पळाला तरी पन्नास कोटी सहज मिळवू शकतो.असा कोणी खासदार सापडला का,त्याने दहा कोटी खर्च करून निवडणूक जिंकला पण एक रूपया विकास निधीतून चोरला नाही?शोधा.नाही सापडला तर घडवा.

       मी जे लिहीले,बोललो हे फक्त मलाच ज्ञान आहे असे नाही.जो जो माणूस खासदार बनू पाहातो,जो नेता त्याला उमेदवारी देतो तो तो यात एम फील आणि डॉक्टरेट झालेला असतो.म्हणून तर अनेक मंत्र्यांना काहीही शिक्षण नसतांना अनेक विद्यापिठाचे कुलगुरू डॉक्टरेट पदवी बहाल करतात.ही डॉक्टरेट गणित, विज्ञान,कृषी यातील नसून चोरी, लबाडी,फ्रॉड या विषयावर दिलेली असते.तशी पदवी आपण आपल्या खासदाराला देणार आहोत, डॉक्टर ऑफ फ्रॉड.प्रधानमंत्रीला देणार आहोत, डॉक्टर ऑफ मेगॅफ्रॉड!

… शिवराम पाटील

९२७०९६३१२२

महाराष्ट्र जागृत जनमंच

        जळगाव.