Home Maharashtra चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना संरक्षण कवच कुणाचे?…..

चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना संरक्षण कवच कुणाचे?…..

 लक्षवेधी

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

           चिमूर तालुक्यातील अवैध धंदेवाईकांचे संबंध हे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांसी जवळचे असल्याशिवाय त्यांचे अवैध धंदे बिनधास्त सुरू राहू शकत नाही.यामुळे चिमूर व भिसी पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांना कुणाचे संरक्षण कवच आहे? हा प्रश्न चिमूर तालुक्यातील महिला-पुरुषांचे मन स्तब्ध करणारा आहे.

           विविध प्रकारचे अवैध धंदे हे समाज बरबादीचे मोठे हत्यार आहेत.हे हत्यार व्यशनाधिन नागरिकांना आणि योग्य नागरिकांना धड जगू देत नाही आणि धड मरु देत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे.

           चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील नागरिक योग्य जगू नये,चांगले राहू नये,समृद्ध बनू नये,पोषक वातावरण त्यांना लाभू नये,असे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडिया आणि चिमूर व भिसी पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांना वाटते काय? 

             जर त्यांना असे वाटत नसेल आणि चिमूर तालुक्यातील लोक सुखी,आनंदी,समाधानी,निरोगी,समृध्द,शांत व सुरक्षित राहावे असे वाटत असेल तर त्यांनी चिमूर तालुक्यातील दारु,सट्टा,वाळू,मुरुम,याबाबतच्या अवैध धंद्यांकडे लक्ष द्यायला हवे आणि सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करायला पाहिजे.

            चिमूर तालुकातंर्गत पोलिस विभागाचे अधिकारी हे सत्ताधाऱ्यांच्या दबावात अवैध धंदे सुरु ठेवतात काय? हा प्रश्न तालुक्यातील महिला-पुरुषांना पडला आहेच…‌ 

     चिमूर तालुक्यातील लोकांसाठी काम व कार्य करणारे आमदार किर्तीकुमार भांगडिया आणि चिमूर व भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार,पोलिस कर्मचारी खरोखरच असतील तर त्यांनी चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करायलाच हवीत!..