ग्राम पंचायतचा स्तुत उपक्रम गवकऱ्यामधुन निवडणार ध्वजरोहणचे मानकरी…

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

ग्रामपंचायत सभागृहात 30 सप्टेंबर 2023 पर्यंत संपूर्ण कराचा भरणा केलेल्या खातेदारामधून 26 जानेवारी 2024 करिता ग्रा.पं. कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी चौक, क्रांतिसुर्य बिरसा मुंडा चौक येथील ध्वजारोहण करण्याकरिता ईश्वर चिट्टिद्वारे खातेदाराची निवड करण्यात आली.

     ते खालीलप्रमाणे

(1) ग्रा.पं.कार्यालय :- मुकुंदा सुकु नैताम

(2) भारतरत्न राजीव गांधी चौक :- तेजराम मारोती सुकारे

(3) क्रांतिसुर्य बिरसा मुंडा चौक :- विजय दादाजी दुफारे

       यांची ईश्वर चिट्टिद्वारे निवड करण्यात आली.

         याप्रसंगी सरपंच सुषमा मडावी, ग्रा.पं.सदस्य रोशन सय्यद, हेमंत शिडाम, ग्रामविकास अधिकारी प्रदीप भांडेकर, ग्रामसभा सचिव सुधीर बाळबुद्धे, भोला पठाण, व्यंकट पुराम, गुरुदेव गावळे, काशीराम कवडो व ग्रा.पं.कर्मचारी उपस्थित होते.