तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन…

ऋषी सहारे

   संपादक

        आरमोरी:- मौजा सालमारा येथे केंद्र जोगिसखरा यांच्यावतीने तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलन दिनांक १८, १९ व २० जानेवारी २०२४ पर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सालमारा येथे आयोजित करण्यात आले होते.

             आज या तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.

             यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष सरपंच संदीप ठाकूर जोगीसाखरा , आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप मांडलिक, सहाय्यक वनपरिक्षेत्रधिकारी मुखरू किनेकर, पळसगाव चे सरपंच, शंकरनगर सरपंच, पंचायत समिती आरमोरी बिडीओ,पत्रकार ऋषी सहारे,लोकमतचे भीमराव मेश्राम,मुख्याध्यापक कृष्णा खरकाटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माधव नारनवरे, संपत कुमरे, केंद्रप्रमुख टेंभूर्णे सर, जांभुळकर सर,तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, तसेच तालुक्यातील सर्व शाळा मुख्याध्यापक, सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष गण, सर्व सदस्य गण, विद्यार्थी, विद्यार्थिनी व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

         प्रास्ताविक कोकुर्डे गट शिक्षणाधिकारी यांनी केले तर संचालन वडपल्लीवार केंद्रप्रमुख यांनी केले.