मुनघाटे महाविद्यालयाच्या रासेयों चे विशेष शिबिराचे उद्घाटन संपन्न…  — समुदायातून शिक्षण व शिक्षणातून सामुदायिक विकास करण्याचे माध्यम म्हणजे रासेयो शिबीर :- प्राचार्य डॉ पंकज चौहान…

भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधि 

        श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जे एस पी एम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे कार्यक्रम मौजा मोहली येथे  दिनांक 17/01/2024 ला करण्यात आले.

         या प्रसंगी उद्घाटक म्हणून ज्येष्ठ नागरिक तथा माजी सरपंच नारायण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंकज चव्हाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मोहली,प्रमुख पाहुणे म्हणून कुलपती मेश्राम, माजी सरपंच मोहली राऊत सर,ग्राम विकास अधिकारी मोहली, तथा दुर्योधन सहारे, ग्रामपंचायत सदस्य कपिल कुमरे,सुरेंद्र वाघाडे, प्रफुल ग्रामपंचायत सदस्य प्रा.  डॉ. कीरमिरे सर, प्रा. डॉ.लांजेवार सर, डॉ.वाघ सर, प्रा.डॉ.गोहणे, डॉ. मुरकुटे, डॉ.विना जंबेवार इत्यादी मान्यवर मंचावरती उपस्थित होते.

          याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे समुदायातून शिक्षण व शिक्षणातून सामुदायिक विकास करण्याचे माध्यम आहे. ज्याच्या द्वारा तरुणांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो व श्रमसंस्कार शिबिराच्या दरम्यान सात दिवस बाहेरच्या ठिकाणी राहून समाजात राहून समाजसेवा करण्याचे कार्य करावे लागते. हे कार्य करण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना विभाग होय. असे मत अध्यक्ष भाषणातून प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण यांनी केले.

            राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे राष्ट्र विकास घडवून येण्याकरता राष्ट्रीय एकात्मता निर्मितीचे माध्यम आहे. ज्याच्या द्वारा राष्ट्राचा विकास घडवून नवयुवक सुजाण व जागरूक बनतो हे अतिशय उपयुक्त माध्यम आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचे साधनाची अत्यंत उपयुक्तता आहे. असे मत कुलपती मेश्राम यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना मत व्यक्त केले.

              याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनाच्या क्रमाचे प्रास्ताविक प्रा.ज्ञानेश बनसोड राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी यांनी केले,तर कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रियंका पठाडे राष्ट्रीय सहाय्यक अधिकारी यांनी केले.  आभार प्रदर्शन प्राध्यापिका गीताचंद्र भैसारे यांनी केले.

            यावेळी प्रा. डॉ. धवनकर, प्रा.वाळके, प्रा.नीतेश पुण्यप्रेड्डीवार, प्रा.मानतेश तोंडरे,  प्रा.करमनकर, प्रा. खोब्रागडे, प्रा.धकडे, प्रा.रणदिवे,  प्रा.वटक मॅडम, श्रीमती सज्जन पवार मॅडम, गणेश लांबट, हरीश गोहणे, भास्कर कायते, मनोज नन्नावरे, जीवन घोरपडे, राकेश बोनगिरवर,  बालाजी राजगडे तथा प्रशासकीय संपूर्ण कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.