जिल्हा क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत उपविभाग दर्यापूरने पटकविले विजेतेपद…

युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक

         अमरावती जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा चे आयोजन विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे दिनांक 12 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले होते.

            जिल्ह्यातील महसूल विभागातील विभागीय आयुक्त पासून तर कोतवाल कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवून खेळाडू वृत्तीने आपले खेळाचे प्रदर्शन करीत व आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून मनमुराद आस्वाद घेतला.

           सदर स्पर्धेचे आयोजन उपविभाग दर्यापूरच्या वतीने करण्यात आले होते. आयोजन उत्कृष्टरित्या पार पाडले. त्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी उपविभागीय अधिकारी दर्यापूर मनोज लोणारकर व त्यांच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करून सर्वांचे आभार मानले.

            या तीन दिवसीय खेळ व स्पर्धा उत्कृष्टरित्या नियोजनात्मक पार पाडून सर्व कर्मचाऱ्यांचाआनंद द्विगुणित करण्यात उपविभाग दर्यापूर यशस्वी ठरला. दर्यापूर उपविभागाने सांस्कृतिक आणि क्रीडा विजेते पटकवले त्याबाबत दर्यापूर वाशियांकडून सर्वत्र उपविभागीय दर्यापूर व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

            मनोज तायडे यांनी मनसे दर्यापूर तर्फे तसेच मुद्रांक विक्रेता व दस्तऐवज संघटना दर्यापूर यांच्यातर्फे उपविभागीय अधिकारी यांचे व त्यांच्या टीमचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.