Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी १६ तर नगरसेवकपदासाठी तब्बल २१२ अर्ज दाखल…...

आळंदी नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी १६ तर नगरसेवकपदासाठी तब्बल २१२ अर्ज दाखल… — प्रशांत कुऱ्हाडे विरुद्ध प्रकाश कुऱ्हाडे – सरळ सामना होण्याची शक्यता…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दिवसभरात उमेदवार आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी निवडणूक अधिकारी कार्यालयात पाहायला मिळाली. नगराध्यक्षपदासाठी १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. तर १० प्रभागांमधून नगरसेवकपदासाठी तब्बल २१२ अर्ज दाखल झाले आहेत.

नगराध्यक्षपदासाठी प्रशांत कुऱ्हाडे – प्रकाश कुऱ्हाडे यांच्यात थेट सामना

       एकाच कुऱ्हाडे घराण्यातील दोन प्रतिष्ठित नेत्यांमध्ये आगामी निवडणुकीत थेट लढत पाहायला मिळणार आहे. भाजपाचे प्रशांत कुऱ्हाडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश कुऱ्हाडे या दोघांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आळंदीतील राजकीय समीकरणांना नव्या कलाटणीची सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूंनी समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रचार अधिक जोमाने सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

नगरसेवकपदासाठी मोठी चुरस : २१२ अर्ज

        आळंदीतील १० प्रभागांसाठी नगरसेवकपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. असून नवीन चेहऱ्यांचीही मोठी संख्या यंदा स्पर्धेत उतरली आहे. भाजपाने २१ ठिकाणी उमेदवार दिले आहेत यामध्ये शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व अजित पवार गट यापक्षातील नेत्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुध्दा भाजपाकडून उमेदवारी मिळाली आहे तर काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

       राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुध्दा भाजप व शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संधी दिली आहे. शिवसेना शिंदे व ठाकरे गट तसेच काँग्रेस पक्षांनी सुध्दा आपले उमेदवार उभे केले आहे. मंगळवार ( दि.२५ ) दुपारी तीन नंतरच आळंदी नगरपरिषदेच्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

नगरसेवक पदासाठी आलेले एकूण प्रभाग निहाय अर्ज खालील प्रमाणे

प्रभाग क्रमांक १अ – अर्ज १४

 प्रभाग क्रमांक १ब – अर्ज ७

प्रभाग क्रमांक २अ – अर्ज १०

प्रभाग क्रमांक २ब – अर्ज ११

प्रभाग क्रमांक ३अ – अर्ज ९

प्रभाग क्रमांक ३ब – अर्ज ४

प्रभाग क्रमांक ४अ – अर्ज ११

प्रभाग क्रमांक ४ब – अर्ज १२

प्रभाग क्रमांक ५अ – अर्ज ७

प्रभाग क्रमांक ५ब – अर्ज ७

प्रभाग क्रमांक ६अ – अर्ज ८

प्रभाग क्रमांक ६ब – अर्ज ११

प्रभाग क्रमांक ७अ – अर्ज १२

प्रभाग क्रमांक ७ब – अर्ज ९

प्रभाग क्रमांक ८अ – अर्ज ७

प्रभाग क्रमांक ८ब – अर्ज ७

प्रभाग क्रमांक ९अ – अर्ज ८

प्रभाग क्रमांक ९ब – अर्ज १६

प्रभाग क्र. १०अ – अर्ज १७

प्रभाग क्र. १०ब – अर्ज ११

प्रभाग क्र. १०क – अर्ज १४