अबोदनगो एस चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
चिखलदरा :- मेळघाट मधिल चिखलदरा तालुक्यातील काटकुभ ग्रामपंचायत मध्ये आज ग्रामसभा घेण्यात आली. आझादी विशेष ग्रामसभा मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान करिता आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये विवीध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये शेतपादन रस्ता पात्र घरकुल 2011पुर्वी चे अतिक्रमण नियमानुकुल करने, योजनाची प्रभावी अंमलबजावणी जलदगतीने करने, शेवटच्या घटकांपर्यंत पोहचने, सुलभ रितिनेसेवा देने,लोकांचे जिवनमान उंचावने करिता आरोग्य शिक्षण उपजिविका सामाजिक न्यायचा मुख्य क्षेत्रामध्ये लोकांचा सहभाग वाढवुन पंचायत राज संस्था गतिमान करने.
या संकल्पनेव्दारे मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियाना करिता आज ग्राम सभा होती. यामध्ये लोकांनी प्लास्टिकबंदी,दारुबंदी, श्रमदान करुन ग्राम स्वच्छ करने असे निर्णय घेऊन ठराव पारित केले. ग्रामसभेत मोठ्या संख्येने लोक उपस्थिती होते.
यामध्ये काटकुंभ गावातील सरपचा ललिता ताई बेठेकर, उपसरपचा वैशाली राठोड, सचिव ताई, ग्रामपंचायत सदस्य सोनु मालविय, काटकुंभ केन्द्रातिल केन्द्र प्रमुख नामदेव अमोदे, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष योवाश चव्हाण, पोलीस पाटिल, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, रोजगार सेवक तथा ग्रामपंचायत कर्मचारी हे उपस्थित होते.



