Home देशविदेश मोकाट जनावरांचा त्रास आणि अस्वच्छ भारत…

मोकाट जनावरांचा त्रास आणि अस्वच्छ भारत…

          आपल्या देशात मोकाट जनावरांची संख्या कितीतरी कोटी आहे,अर्थात गावोगावी आणि शहरात पण गल्लोगल्ली मोकाट जनावरे फिरत असतात,यातील काही मालकी ची असतात तर काही मालक नसलेले असतात,तर काही देवाची असतात.म्हणजे काही गायी गोरे नवसाची असतात,बोललेला नवस पूर्ण झाल्यामुळे देवाला गाय किंवा गोरे दान करतात.परत अशा नवसाच्या गायी पासून अनेक गायी गोरे जन्मतात,तीही पण भटकेच मोकाट असतात.अशा प्रकारे मोकाट गायी आणि बैलांची संख्या दरवर्षी वाढतच जाते.त्यामुळे ही जनावरे कळपाने राहतात.कुत्री नवसाचे नसतात,पण एक कुत्री अनेक पिल्लांना जन्म देते,म्हणून दरवर्षी त्यांची संख्या वाढतच जाते,मोकाट शेळ्या मात्र मालकीच्या असतात,मालक सकाळी बसस्टँडला नेऊन सोडतो,दिवसभर केळांची सालपते खाऊन तर्र होतात, बाकड्यावर बसतात,झोपतात, बाकड्यावर आणि सऱ्या बस स्थानकात लेंड्या आणि मुत्र सोडून घाण करतात,याबद्दल कंट्रोलर, डेपो व्यवस्थापक ही घाण बघूनही डोळ्यावर झापड टाकतात.प्रवाशांनी तक्रार केली तर त्याकडे दुर्लक्ष करतात,पण शेळ्यांच्या मालकाना तंबी देत नाहीत.याचे कारण काय ते शोधावे लागेल.मोकाट गायींना ज्यांन्या गायी पण म्हणतात,आणि बैलांना क ठा ल्या म्हणतात.जे देवाची असतात म्हणून.यावरून रिकामटेकड्या बाईस आणि गड्याला पण उपहासाने ” काय कटाली गायी सारखी फिरते आहेस,किंवा काय क टाळया सारखा फिरतोस ” असे म्हणतात.

         असे मोकाट असंख्य गायी बैल गावोगावी ,आणि शहरात गल्लोगलीत आणि तेही कळपाने फिरतात,लोकही शिळ्या भाकरी भात,उरलेले खरकटे,त्यांना देतात,किंवा त्यांच्यासाठी रस्त्यावर टाकतात,आणि रस्ते घाण करतात.

गाढवाचा मालक पण त्यांचा ओझ्यासाठी वापर करतो आणि काम झाले की,रस्त्यावर हाकलून देतो.

         काही लोक डुकरे पळतात,पण त्यांना बंदिस्त न ठेवता मोकाट सोडून अधून मधून बघतात.एक डुकरी दहा बारा पिल्लांना जन्म देते,पण तेवढी सांभाळणे शक्य नसते,शिवाय कुत्र्यापुढे तिचा नाईलाज होतो,तिची छोटी छोटी.पिल्ले फिरत असताना ती पिल्ले कुत्रे उचलतात,त्यांना फाडून खातात,बारा पैकी दोन तीन पिल्ले अखेर वाचवण्यात डुकरीनं यशस्वी होते. वडार लोक डुकराना पकडून त्यास भाजून खातात.

           झुंडी झुंडीनी राहणारे कुत्रे दोन तीन वर्षाचे बालक सापडले तर त्यास पळवून नेतात आणि फाडून खातात.रस्त्याने जाणारा वाटसरू एखाद्या गायीला किंवा बैलाला हाकलण्याचं मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पाठलाग करून त्यास लोळे पर्यंत शिंगेने मारतात,त्यास कुणी सोडविले नाही तर मारून पण टाकतात.ही सारी उदाहरणे आपणास सोसियल मिडिया मध्ये दिसतात.

         गाढव गायी बैल वाहनांना वाट देत नाहीत.चौकात रस्त्यावर कुठेही बसतात,त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो.रस्त्याने जाताना वाहनापुढे अचानक येतात,त्यामुळे एक्सिडेट होतात.

          कोटीत असलेल्या या मोकाट जनावरांची रस्त्यावर पडणारी विस्टा मूत्र किती असेल याची कल्पनाही करू शकत नाही.यामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.घरातील कचरा शासकीय व्हॅन मध्ये टाकतो,पण या मोकाट जनावरे,भटके कुत्री यांनी केलेली रस्त्यावरची घाण कशी काढणार? शक्यच नाही.तर मग आपले स्वच्छ भारताचे स्वप्न कसे साकार होणार? शक्यच नाही.मग स्वच्छ भारताचा नारा फेल ठरतो आहे.

           मुक्या प्राण्यावर दया करण्याची सर्वधर्माची शिकवण आहे,ती ठीकच आहे.पण त्यांना मोकाट सोडून जनतेला त्रास देणे,सारा भारत घाण करणे,हे कोणत्याच धर्मात नाही.मोकाट जनावरांचा बंदोबस्त करू नये,त्यांना पकडून पाळू नये,किंवा त्यांचे एका छताखाली संरक्षण,पालन पोषण करू नये,असे कोणताच धर्म सांगत नाही. गाय पवित्र म्हणून तिला रस्त्यावर सोडणे,तिला दारोदार भीक मागायला लावणे,तिला सडके शिळे अन्न देणे , ही कसली भूत दया ? त्यापेक्षा या सर्व भटक्या कुत्र्यांना पकडून एके ठिकाणी ठेवणे,त्यांचे पालन पोषण करणे, गायींना गोवर्धन शाळेत ठेवणे आणि शेळ्या आणि गाढवाच्या मालकांना मोकळे सोडण्याबद्दल तंबी देणे , हे शक्य नसेल तर अशा मोकाट भटक्यांना पकडून त्यांचा लिलाव.करणे आणि तो पैसा ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचे खात्यात जमा करणे ,हे उपाय आहेत.

          उपाय आहेत,पण ग्रामपंचायत आणि नगरपालिका असे का करीत नाहीत,? याचा जाब नागरिकांनी संघटितपणे विचारला पाहिजे, सीईओ,कलेक्टर,आमदार,खासदार ,सरपंच,नगराध्यक्ष यांना अनेक संघटनांनी ,नागरिकांनी,पक्षांनी निवेदने दिली पाहिजेत.

         थोडक्यात काय तर,मोकाट जनावरांपासून नागरिकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी ,आणि स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करणेसाठी,गाव नगर देश स्वच्छ राहण्यासाठी , मोकाट जनावरांचे संरक्षण आणि पालन पोषण करण्यासाठी,त्यांना बेवारस ना करण्यासाठी त्यांचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे.

        लेखक : दत्ता तुमवाड.

           सत्यशोधक समाज नांदेड.

        दिनांक : 18 सप्टेंबर 2025.फोन : 9420912209.