शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
तळोधी (बा). शहरातील गंगासागर हेटी येथे 15/4/2025 ला सकाळी 06:30 सुमारास मोहफुल गोळा करायला गेलेल्या मारोती सखाराम बोरकर यांच्या वर दबा धरून बसलेल्या वाघाने हाला केला.या हल्यात ते जागीच ठार झाले होते.
आज दि. 18/4/2025 रोजी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडिया यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनस्पर भेट घेतली.यावेळी वन विभागाने 9,50,000/- रु. आर्थिक मदत आमदार बंटीभाऊ यांच्या हातून बोरकर यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द केली.
यावेळी वन अधिकारी कर्मचारी,भाजपा पदाधिकारी,स्थानिक गावकरी व सहकारी उपस्थित होते.



