शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुकातंर्गत मौजा मोटेगांव येथील मोरेश्वर सोनवणे वय 45 व मुलगा सागर सोनवणे वय 11 वर्ष हे बापलेक 24 फेब्रुवारीला प्रयागराजच्या महाकुंभमेढाव्यात पवित्र स्नान करण्यासाठी गोंदिया वरून रेल्वेने निघाले होते.
मात्र,जबलपूर जवळ चोरट्यांनी जबरदस्तीने बॅग हिसकावल्यामुळे कपडे व पैसे दोन्ही चोरीला गेले त्यानंतर बापलेक कसेबसे प्रयागराजला पोहोचले.गंगा नदीवर स्नान करून दुसऱ्या तीरावर पोहचले
. परंतु हातात खर्चासाठी आणि गावाकडे येण्यासंबंधाने प्रवास करण्यासाठी पैसा नसल्याने तब्बल 43 दिवस बापलेकांनी भटकंती केली.
अखेर हतबल झालेल्या वडिलांनी गडफास लावून आत्महत्या केली,तर मुलगा पोलिसांच्या मदतीने सुखरूप घरी पोहोचला असून नीयतीच्या या घाल्याने मोठेगावातील तसेच परिसरातील नागरिकात हळहळ व्यक्त होत आहे.
मोटेगांव येथील रहिवासी मोरेश्वर सोनवणे आणि त्यांचा मुलगा सागर हे दोघेही घरी कुणालाही न सांगता कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला रवाना झाले.
चोरीच्या घटनेनंतर आर्थिक विवंचनेमुळे बापलेक वाराणसीच्या रस्त्यावर फिरू लागले.रात्र झाली की कुठेही उघड्यावर झोपायचे.मिळेल ते खायचे असा बापलेकाचा नित्यक्रम 43 दिवसापासून सुरू होता.
दरम्यान मागील 43 दिवसापासून बापलेक बेपत्ता असल्याने गावाकडे नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला.दरम्यानच्या काळात जबलपूर येथे आहोत,असा गावामध्ये फोन आला.
त्यामुळे गावातील चंदू रामटेके यांच्यासह काही जण जबलपूरला पोहोचले.तेथे त्यांचा शोध घेतला,परंतु त्यांचा थांगपत्ता न लागल्याने ते गावाकडे परत आले.
43 दिवसानंतर वाराणसी पोलिसांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून मुलगा सुखरूप असल्याची माहिती दिली.
त्यानंतर गावातील चंदू रामटेके,विलास कोराम,संजय सोनवणे आणि मुलाच्या आईसह नातेवाईक वाराणसीला रवाना झाले.
कठीण परिस्थितीला वैतागलेल्या मुलाच्या वडिलांनी 8 एप्रिलला झाडाला गळफास लावून जीवन यात्रा संपवल्याची माहिती समोर आली.
वाराणसी नदी काठावर मोरेश्वर यांच्यावर अंत्यसंस्कार करून नातेवाईक आणि गावकरी मुलाला घेऊन घरी परतले आणि तेही कायमचे डोळ्यात अश्रू घेऊनच!.
महा कुंभमेळ्यात गेलेल्या बापलेकांवर ओढावलेल्या बिकट स्थितीमध्ये वडिलाला कायमचे गमावल्याने गाव तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उत्तर प्रदेश शासनाने महाराष्ट्र राज्यांत येत असलेल्या चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा मोटेगाव येथील कुटुंबाला आर्थिक मदत करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
*****
बॉक्स..
आमदार भांगडियाकडून कुटुंबाला मदत..
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांना मोटेगांव येथील विलास कोराम यांनी सदर दुःखद् घटनेची माहिती दिली.
त्यांनी तात्काळ वाराणसीला जाण्यासाठी वाहन खर्चाला आर्थिक मदत दिली.तसेच वाराणसी येथील पोलीस ठाण्यात फोन करून मोरेश्वर सोनवणे यांच्या कुटुंबियांना सहकार्य करावे आणि मदत करावी अशा या सूचना दिल्या.
तसेच प्रशासकीय अडचणी आल्या तर सोडविल्या जाईल असा विश्वासही कुटुंबीयांना दिला होता.
******
बाॅक्स…
श्रध्दा अशी एक परंपरा आहे की कुठल्याही मानुस कुठेही देवदर्शनाला किंवा परंपरागत कार्यक्रमाला आणि मेळाव्याला जातोय.
पण,अशा ठिकाणी गेल्यानंतर वास्तविकतेला अनुसरून कठीण अतीप्रसंग ओढावलातर साधूसंतांचा आशिर्वाद किंवा मनुष्य मात्रांची अफाट श्रध्दा सुध्दा त्यांना तारु शकत नाही हेच मोरेश्वर सोणवाने यांच्या अतिशय दुःखद् आत्महत्या प्रकरणाणे समोर आणले आहे.



