Home Maharashtra शिगंणापूर शाळेचा शाज हमदान अब्दुल शहजाद गणित ऑलिपियाड परीक्षा मध्ये राज्यस्तरावर प्रथम…

शिगंणापूर शाळेचा शाज हमदान अब्दुल शहजाद गणित ऑलिपियाड परीक्षा मध्ये राज्यस्तरावर प्रथम…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक 

        जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर (मुले) च्या शिरात पुन्हा मानाचा तुरा नवोदय परीक्षेच्या यशानंतर फेब्रुवारी 2025 ला झालेल्या इंटर नॅशनल टॅलेंट ऑलि्पियाड परीक्षा च्या अंतिम फेरीत वर्ग 3 चा विद्यार्थी शाज हमदान अब्दुल शहजाद हा इंटर नॅशनल टॅलेंट ऑलिपियाड परीक्षा मध्ये अंतिम फेरीत राज्य स्तरावर प्रथम ठरला आहे.

            वर्ग 5 ची विद्यार्थिनी भाग्यश्री चिमणकर ही राठी एज्युकेशन इन्स्टिटयूट अमरावती येथून मधून पाचवी ची वर्गाची टॉपर ठरली आहे तसेच सक्षम रसे हा 6 वी तील विद्यार्थी गणित ऑलि्पियाड परीक्षा मध्ये सहावी मधून टॉपर ठरला.  

        यामुळे विद्यार्थ्यांनी शिंगणापूर शाळेचे आणि गावाचे नाव मोठे केले आहे. तसेच स्वराली ज्ञानेश्वर मोहोड ही इंग्रजी ऑलि्पियाड परीक्षा मध्ये राठी एज्युकेशन हब या मधुन पाचवी मधुन टॉपर ठरली सर्व ह्या यशाचे श्रेय त्यांच्या मुख्याध्यापिका शिला आठवले ,वर्गशिक्षिका संगीता टोपे ,मनिषा अवघड,ललिता फुटाणे ,लता कडू , शहजाद , राजेंद्र पानझाडे(शा.व्य.स.अध्यक्ष)आणि आई वडिलांना देत आहे.

        ह्या परीक्षेत ज्ञान कौशल्य आणि उच्च विचार क्षमतेवर आधारित तसेच तार्किक ते वर आधारित प्रश्न विचारले जातात.